У нас вы можете посмотреть бесплатно पपई लागवड संपूर्ण माहिती | papai lagwad mahiti in marathi или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ==================================================================== 👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे. ✅आजचा विषय - 🌱पपई लागवड संपूर्ण माहिती | papai lagwad mahiti in marathi👍 पपईची लागवड महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. 1. हवामान: - पपईच्या वाढीसाठी हवामान हे उष्ण व दमट आवश्यक असते. पपई 15ºC-30ºC तापमानाच्या श्रेणीत चांगले वाढते. जर तापमान 9 ते 13 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर फळे पक्व होण्याची क्रिया थांबते. तसेच झाडाची वाढ व फळधारणा होत नाही, जोरदार वारे, अति थंडी पपई पिकाला मानवात नाही. 2. पपई लागवडीसाठी हंगाम: - पपई लागवड वर्षभर करता येते. जून - जुलै, सप्टेंबर - ऑक्टोंबर आणि जानेवारी - फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. महाराष्ट्रात जास्त प्रमाणामध्ये लागवड जुन-ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते. 3. पपई लागवड कशी करावी ? - पपई लागवड बियांपासून रोपे तयार केली जाते. एकरी 2 ते 3 पाकिटे (10 ग्रॅमची ) बी पुरेसे होते. बियांपासून रोपे तयार होण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. रेड लेडी बियाणाच्या 10 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये सुमारे 600 बिया असतात आणि हे बियाणे नर्सरीमध्ये तंत्र शुध्द पद्धतीने उगवले तर सुमारे 90 टक्के अंकुरित होतात. 4. पपईचे रेड लेडी 786 का वापरावे ? - हायब्रिड प्रकारांमध्ये त्याचा समावेश होतो. या वाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेड लेडीच्या सर्व वनस्पती फळ देतात कारण ही झाडे उभयलिंगी म्हणजेच नर मादी फुले एकाच झाडावर लागतात म्हणून त्याचे एकाच ठिकाणी एकच रोप लावावे लागते. लागवडीनंतर केवळ 9 महिन्यांनी वनस्पतींना फळे दिसू लागतात. या प्रकारच्या फळांची साठवण क्षमता इतर जातींपेक्षा जास्त आहे. 5. पपई रोपवाटिका तयार करणे - पपई रोपवाटिका माध्यम तयार करण्यासाठी 5 किलो कोकोपिट + 2.5 किलो पोयटा माती + कुजलेल शेणखत + 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा + 100 ग्रॅम. 19:19:19 खत या प्रमाणात मिश्रण तयार करून ते ट्रे किंवा पॉलीथीन बॅगमध्ये भरून द्यावे. तसेच यामध्ये बिया 1.5 सें.मी खोलीवर टोकाव्यात. बियाणे टाकल्यानंतर अलगत झाकून टाकावे व झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. तसेच पॉलीथीन बॅगमधील किंवा ट्रे मधील रोपे शेडनेट मध्ये ठेवावेत. 6. पपई लागवड पद्धत - पपई लागवडीपूर्वी जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी. कुळवाने वखरपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत व जमीन सपाट करून घ्यावी. पपई लागवड 8 x 6 फुट अंतरावर पपईची लागवड केली तर एकरी सुमारे 930 रोपे लागतील. 7. खत व्यवस्थापन : - पपई लागवड करताना एकरी ५ टन शेणखत व प्रति झाड १०० ग्राम युरिया + १०० ग्राम डी.ए.पी + ८० ग्राम एम.ओ.पी. द्यावे. नंतर लागवडी नंतर तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या महिन्यामध्येहि प्रति झाड १०० ग्राम युरिया + १०० ग्राम डी.ए.पी + ८० ग्राम एम.ओ.पी. द्यावे. जमिनीमधील अन्नद्रव्ये आणि मातीपरीक्षणानुसार खतांची मात्र कमी जास्त होऊ शकते. 8. पाणी व्यवस्थापन : - पाटपाणी : 7 - 10 दिवसाच्या अंतराने ठिबक : 2 - 3 दिवसाच्या अंतराने पक्वता जवळ येत असताना झाडाला खूप दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. मातीचा प्रकार आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार सिंचनाचे वेळापत्रक निश्चित करावे. 9. आंतरपिके : - पपईत आंतरपिके घेण्यासाठी घेवडा, चवळी, कांदा, मुळा, भूईमूग, वाटाणा या पिकांची आंतरपिके म्हणून लागवड करता येते. 10. कीड रोग नियोजन : - पपई पिकांमध्ये मावा, अळी, लाला कोळी, निमॅटोड ह्या किडींचा व मर रोग, करपा, भुरी, डावानी मिल्ड्यू, फळ सड इ. रोगाचा प्रधुरभाव होतो. 11. काढणी : - पपई काढणी हि पपईची लागवड केल्या पासून दहा ते बारा महिन्यामध्ये पपई काढणीस येते. फळ काढणीसाठी तयार झाल्यावर पपई वर पिवळे डाग पडतो आणि फळातून निघणारा चीक पातळ पाण्यासारखा बाहेर निघतो तेव्हा समजायचे कि पपई हे फळ काढणीसाठी तयार झाले आहे. 12. उत्पादन : - १. एका झाडापासून एका वर्षी 70 ते 100 फळे मिळतात. २. या फळांचे वजन साधारणतः 700 ग्रॅम ते 2-3 किलो पर्यंत असते. ३. दरवर्षीं सरासरी 40 ते 50 टन पर्यंत उत्पादन मिळते. तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G 👉वेबसाइट - www.bharatagri.com 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal