Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जंगली झाडांची लाखो रोपं तयार करून जंगलांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेले -शरद शिंदे. в хорошем качестве

जंगली झाडांची लाखो रोपं तयार करून जंगलांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेले -शरद शिंदे. 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जंगली झाडांची लाखो रोपं तयार करून जंगलांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेले -शरद शिंदे.

जंगली झाडांची लाखो रोपं तयार करून जंगलांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेले -शरद शिंदे. देशी आणि जंगली झाडांची लाखो रोपं तयार करून जंगलांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेले हॆ जगावेगळे व्यक्तिमत्व --शरद गणपत शिंदे. wp - 7758056984, 9067796657, पुणे ज़िल्हातल्या पवना धरणाजवळचे शिळीम हॆ डोंगर कुशीतीलं वृक्षवल्लिंनी समृद्ध असलेलं गाव. ह्या गावात शेतकरी कुटुंबात वाढलेले हॆ शरद गणपत शिंदे. जन्मापासून आज वयाच्या साठीपर्यंत याच डोंगर कुशीत मोठे झाले. गरीबी होती पण पिढीजात पोटापुरती शेती होती. उपजीविकेसाठी घरच्यांबरोबर शेती करण्याला पर्याय नव्हता, त्यामुळे शाळा झाली ती जेमतेम चौथी पर्यंत. दगड, माती, डोंगर, दऱ्या, नदी, ओढे, श्वापदे आणि जंगल देवराया हीच त्यांची शाळा आणि तेच त्यांचे शिक्षक. वडिलांपर्यंत फक्त शेती हीच उपजीविका होती. नंतरच्या काळात शरद शिंदे यांना जंगलातून वृक्षांची रोपं आणि बिया गोळा करून आणायचा छंद लागला. त्यातूनच ही त्यांची नष्ट होणाऱ्या जंगली वृक्षांची नर्सरी तयार झाली. आजपर्यंत शिंदेनी जंगली झाडांची लाखो रोपं तयार करून भरत भर पाठवली आहेत. पैशाला महत्व न देता निसर्गाची सेवा आणि मानव निर्मित देवराया तयार करण्याचा ध्यास धरून जंगली वृक्षावल्लिंना सगेसोयरे करून त्यांच्या बरोबर अखंड पणे शिंदे काम करत आहेत. अनेकांना शिंदे यांचे हॆ प्रयोग वेडेपणाचे वाटतात. जंगली झाडांवर शिंदेंचे खूप प्रेम आहे. त्यांच्याबरोबर जंगलातून फिरताना शिंदे वेळप्रसंगी झाडांशीही बोलतात. नर्सरीतून फक्त पैसे मिळवणे हा हेतू न ठेवता जंगलांचे संवर्धन कसे होईल याचा विचार ते आधी करतात. जंगलातले नैसर्गिक वातावरण मुद्दाम तयार करण्याचेही शिंदे यांचे प्रयोग चालू असतात. पुढील काळात पूर्वीसारख्या देवराया कशा निर्माण होतील असा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. वेळोवेळी वनस्पती अभ्यासक व विद्यार्थी त्यांच्या कडे मार्गदर्शनासाठी येत असतात. आज जंगलांचा नाश होत आहे असं आपण म्हणत असतो. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गांवर आहेत. अन्न साखळीत प्रत्येक जीवाचे महत्व आहे. जंगले आपल्याला भरभरून देत असतात. मानवकडून मात्र निसर्गाला विविध प्रकारे ओरबाडण्याचे काम सुरु आहे. पण यातच शिंदे यांचे हॆ काम पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या ह्या कामाला आमचा सलाम. #elderly #seniorcitizens #dementiaawareness #measures #caregiving #seniorcitizen #homehealthcare #seniorcare #dementia #elderlycare #eldercare

Comments