Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जगात चर्चा असलेल्या साताऱ्याच्या कास पठाराची संपूर्ण माहिती|जगात दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती इथे आढळतात в хорошем качестве

जगात चर्चा असलेल्या साताऱ्याच्या कास पठाराची संपूर्ण माहिती|जगात दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती इथे आढळतात 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जगात चर्चा असलेल्या साताऱ्याच्या कास पठाराची संपूर्ण माहिती|जगात दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती इथे आढळतात

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.[१] अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात.रस्ता नाही, गाडया नाहीत, पर्यटक नाहीत, त्यामुळे प्रदूषण नाही. येथे आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खातात. त्याचप्रमाणे कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात. मानवाचा अडथळा नाही, त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र अव्याहतपणे चालू आहे. गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते. त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात. निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा जुलैमध्ये चालू होतो, तो सप्टेंबरपर्यंत पहावयास मिळतो. सप्टेंबरमध्ये भांबवलीचे संपूर्ण पठार विविध रंगांनी फुललेले दिसते. जणू काही निसर्ग देवतेचे मंदिर रंगांची उधळण करत आहे. भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळ्यात ठणठणीत कोरडे असते. काळाकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठ आश्चर्य आहे. दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. या पठारावर विजनवासातील "पांडवांच्या" पायाचे ठसे पहावयास मिळतात (असे सांगितले जाते.). साताऱ्याहून कासला जाता येते. कास मंदिराच्या पुढे धावली फाटा आहे, तिथून ३ किमीवर पुनर्वसित तांबी वस्तीला आहे. तांबीपासून ५०० मीटरची चढण चढल्यावर भांबवलीच्या सड्यावर जाता येते. या पठारावर आल्यावर आपण या भागातील सर्वोच्च ठिकाणी आल्यासारखे वाटते. या पठारावर नीरव शांतता असते. बारमाही गार वारा असतो. येथे जणू काही वाऱ्याचीच सत्ता. सुळसुळ वाहणारा वारा, त्याचाच सूर आणि त्याचेच गाणे. थंडीमुळे स्वेटर असणे आवश्यक आहे. भांबवली पठाराच्या पूर्वेकडे सज्जनगड, उरमोडी जलाशय दिसतो तर पश्चिमेकडे कोयनेचा शिवसागर जलाशय, वासोटा किल्याचा गर्द झाडीतील डोंगर; कोयना, सोळशी व कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. उत्तरेकडे कास पुष्प पठार तर दक्षिणेकडे चाळकेवाडीचे पवनचक्कीचे पठार. हे सर्व भांबवलीच्या एकाच पुष्प पठारावरून.पहावयास मिळते, अनुभवता येते., या पठारावर निसर्गाच्या सहवासाबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन देखील होते. भेकरे, ससे दूरवर पळताना दिसतात. बिबट्या, अस्वलासारखे हिंस्त्र प्राणी देखील पठारावर येतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पठारावर खूप ठिकाणी निसरडे झालेले असते. त्यामुळे घसरण्याची शक्यता असते. पठारावर दाट धुक्याची चादर पांघरलेली असते आणि पठाराच्या दोन्ही बाजूला सरळसोट कडे आहेत. दाट धुक्यामुळे आपण कड्यापर्यंत आलो आहोत हे कळत नाही, त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगावी. कास पठारावर विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ, केरळ, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत. ----------------------------------------------------------------------------------------------------------- Ignor Hashtags: #kaaspathar #kaasplateau #kaluWaterfall #GodVAlley #MalshejGhat #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall ---------------------------------------------------------------------------------------------------

Comments