Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) в хорошем качестве

झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan)

झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) मित्रांनो गावाला गेलो की आई वेगवेगळे पदार्थ बनवत असते त्यामध्ये मासे, खेकडी यांचे कालवण सुद्धा असतं. आमच्या गावाच्या बाजूला भाराजा नदीची खाडी आहे. खाडीमध्ये बरीच खेकडी सहज बिळात मिळतात. बोळातून खेकडी काढण्याची पद्धत पण निराळीच आहे. खेकड्याचं कालवण अतिशय चविष्ट होते. आम्ही नेहमी खेकड्याचं कालवण झणझणीत म्हणजे तिखटच बनवतो. आई बोलते तिखट खेकड्याचं कालवण / रस्सा गरमागरम प्यायलो की सर्व सर्दी पडसे नाहीसे होतं. सर्दी पडस्यावर रामबाण उपाय आहे खेकड्याचे कालवण. आईच्या हातच्या खेकड्याच्या रेसिपीला काही तोड नाही. आई अतिशय गावरान पद्धतीने खेकड्याचे कालवण तयार करते. गोडा मसाला वापरून, खेकड्याच्या आंगड्या पाट्यावर वाटून त्याचा रस कालवणात घातला जातो. चुलीवर या खेकड्याचं कालवण जबरदस्त होते. खाडीतली काळी खेकडी भरलेली असतात. भात कापण्याच्या वेळेस खूप जास्त खेकडी सापडतात. कोकणात गावी खेकडी खाण्याची एक वेगळीच मजा असते. #CrabCurry #KhekdycheKalvan #KhekdaRassa #sforsatish आम्ही खाडीतून खेकडी पकडून घरी आणली. आईने ती खेकडी व्यवस्थित साफ करून तिच्या पद्धतीने तिने घातली. गावी अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात. काकांचा मुलगा सार्थक खूप बोलका आहे तो पण कालवण तयार करताना आला होता. आईने तयार केलेल्या खेकड्याच्या कालवणाची चव जिभेवर कायम रेंगाळत राहील अशीच होती. मी मनसोक्त पोटभर खकड्याचा रस्सा, कालवण प्यायलो. सर्दी पडसे गायब झाले. गावी कधी कोकणात आलात किंवा बाजारातून खेकडी विकत घेतलीत तर अशा पद्धतीने कालवण घालून बघ जाम भारी तयार होते खेकड्याचं कालवण. तुम्ही खेकड्याचे कालवण कसे तयार करता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar  

Comments