Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ताज्या फ्रेश मच्छीचे कालवण 😍 | आईच्या हातचे साधे सोपे Mandeli Kalvan (Konkan) в хорошем качестве

ताज्या फ्रेश मच्छीचे कालवण 😍 | आईच्या हातचे साधे सोपे Mandeli Kalvan (Konkan) 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ताज्या फ्रेश मच्छीचे कालवण 😍 | आईच्या हातचे साधे सोपे Mandeli Kalvan (Konkan)

ताज्या फ्रेश मच्छीचे कालवण 😍 | आईच्या हातचे साधे सोपे Mandeli Kalvan (Konkan) आमच्या गावात दर दिवशी मासे विक्री करण्यासाठी दालदी समाजातील महिला येत असतात. "ओ म्हावरो" अशी त्यांची हाक असते. आमच्या घराजवळ आल्या की, "छत्तीसचे बास म्हावरा देऊ?" अशी हाक मारतात. दर दिवशी केळशी मधून ताजे मासे विक्रीसाठी वेगवेगळ्या गावात जात असतात. माझे आंबवली हे गाव केळशी पासून जवळ आहे. आमच्या दरदिवशी जेवणात मासे असतातच असतात. मांदेली, डोमे, मुश्या, लेपा, बगी, बांगडा ही फेमस माशांची नावे जी विक्रीसाठी येतात. आई अगदी सध्या सोप्या पद्धतीने रेसिपी पदार्थ, माशांचे कालवण तयार करत असते. चुलीवर किंवा परशावर अतिशय चवदार हे माशांचे कालवण बनते. अपू मावशी तिची लेक आमच्या गावात मासे विक्री करायला येते. तिच्याकडून आम्ही मांदेली आणि आणखी काही मासे खरेदी केले होते. गावी केळशी मधून विक्रीसाठी येणारे मासे अतिशय चवदार असतात. मोठ्या समुद्रातून मासेमारी करून बोटी केळशी बंदरात आल्या की केळशी दालदोडीमधील महिला ताजे मासे विक्री करायला येत असतात. #MandeliCurry #FishCurryRecipe #FoodInKonkan #sforsatish मांदेली मासे साफ कसे करायचे, हे सुद्धा आईने दाखवले आहे. मासे चांगले स्वच्छ धुवावे लागतात. आई हे मांदेली कालवण जास्त घट्ट नाही की पातळ नाही असे बनवते त्याला ती थिबुल थिबुल बोलते. आईने गॅसवर हे कालवण तयार केले. साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून अतिशय चवदार मांदेली माशांचे कालवण आईने तयार केले होते. भातासोबत, नाचण्याच्या भाकरीसोबत हे माशांचे कालवण एकदम भारी लागते. घरगुती मसाला, गावचे पाणी यात कालवण कसेही घाला ते एकदम चवदार बनतेच अशी गावच्या जेवणाची चव असते. तुम्हाला आईच्या हातच्या आणखी काही रेसिपी व्हिडीओ पाहायला आवडतील तर जरूर कळवा. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! मला संपर्क करण्यासाठी फेसबुक इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar  

Comments