Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб PM Narendra Modi यांच्या Thane दौऱ्यामधून मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी नेमकं काय साध्य केलंय ? в хорошем качестве

PM Narendra Modi यांच्या Thane दौऱ्यामधून मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी नेमकं काय साध्य केलंय ? 7 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



PM Narendra Modi यांच्या Thane दौऱ्यामधून मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी नेमकं काय साध्य केलंय ?

#BolBhidu #NarendraModi #EknathShinde १ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देताना अमित शहा म्हणाले की, “यंदा राज्यात महायुतीचं सरकार येईल पण 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे." शहांच्या शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर यावेळी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढायची आहे त्यामुळे कामाला लागा. यातून अमित शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना तर मेसेज दिलाच शिवाय मुख्यमंत्री बनण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित पवारांना सुद्धा इशारा दिला. शहांनी मुंबई दौरा केल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे दौऱ्यावर होते. ठाण्यातल्या वेगवेगळ्या विकासकामांचं, प्रकल्पाचं उद्घाटन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं. या दौऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे मोदी एकनाथ शिंदेंच्या आग्रहावरून ठाण्यात आल्याचं सांगितलं जातंय. याआधी ऑक्टोबर २०१४ साली ठाणे शहरात मोदी विधानसभेच्या प्रचाराला आले होते. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी मोदींनी ठाणे शहरात पाऊल टाकलं. मोदींच्या ठाणे दौऱ्याचे आणि शहांच्या महायुतीबद्दलच्या वाक्याचे डॉट जर जुळवले तर स्पष्ट होणारी बाब म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातच आगामी विधानसभा लढवल्या जातील आणि महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार रिपीट झालं तर शिंदेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतील. पण या शक्यतेला बळ मिळण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मोदींचा ठाणे दौरा. हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी स्वत: शिंदेंनी लक्ष घातल्याचं बोललं जातंय. मोदींच्या सभास्थळापासून सगळं नियोजन एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तियांनी केल्याच्याही बातम्या आहेत. याचं कारण म्हणजे मोदींचा ठाणे दौरा शिंदेंसाठी राजकीय अर्थानं महत्वपूर्ण ठरु शकतो. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना, महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरु असताना स्वत:च्या होमपिचवर मोदींची सभा घेवून शिंदेंनी अनेक राजकीय डाव खेळल्याचं सांगितलं जातंय. पण मोदींची सभा घेवून शिंदेंनी कोणते राजकीय डाव खेळलेत ? मोदींच्या ठाणे दौऱ्यामधून शिंदेंनी नेमकं काय साध्य केलंय? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments