Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा в хорошем качестве

Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा 6 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा

साहित्य - ७५० ग्रॅम कोळंबी, ३" दालचिनी, २० काळीमिरी, १० लवंगा, ७-८ तेजपत्ता, ३ मोठी मसाला वेलची, १ tea spn घरगुती गरमसाला, १५० ग्रॅम हिरवी पेस्ट (४ हिरव्या मिरच्या, २" आले, १५ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर यांचे वाटण ), १ ½ tea spn हळद पावडर, ४ tbl spn घरगुती लाल मसाला, १०० ग्रॅम भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण, २५० ग्रॅम लहान छोटी बटाटी, ४ tbl spn दही, ४ मोठे कांदे स्लाइस मध्ये काप केलेले, २०-२५ पुदिन्याची पाने, ३ टोमॅटो मध्यम काप केलेली, ५०० ग्रॅम बासमती राईस, २०० ग्रॅम तेल आणि चवीनुसार मीठ. कृती - एका मोठ्या पातेल्यात ५ tbl spn तेल टाकून हलके गरम करावे आणि त्यात अख्खा गरम मसाला टाकून परतून घ्यावा. परतून झाल्यानंतर त्यात साधारण भात शिजविण्यासाठी आवश्यक असणारे पाणी घालावे. १० मिनिटे पाणी उकळून घ्यावे. एका कढईत लहान छोटी बटाटी टाकून ( बटाट्याची साले काढून घ्यावीत. ) त्यात २ tbl spn हिरवी पेस्ट टाकावी, चिमूटभर हळद, २tbl spn घरगुती लाल मसाला टाकावा. ४ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करावे. मंद आचेवर हि बटाटी वाफेवर शिजवून घ्यावी. आता एका भांड्यात स्वच्छ केलेली कोळंबी घेऊन त्यात काप केलेली टोमॅटो, दही, पुदिन्याची पाने, १ tea spn हळद, ३ tbl spn घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करावे. एकजीव झाल्यावर या मिश्रणाला १५-२० मिनिटे बाजूला मुरवत ठेवावे. मसमती भात पाण्याने धुवून घ्यावा. भाताच्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भस्मती भात टाकावा, चवीनुसार मीठ टाकावे आणि मध्यम आचेवर त्याला ७०% शिजवून घ्यावा. भात शिजल्या नंतर त्याला एका मोठ्या चाळणीने गाळून घ्यावा. त्याच पातेल्यात ७-८ tbl spn तेल टाकून चांगले गरम करावे आणि त्यात कांदा तांबूस करून परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यातला अर्धा कांदा बाजूला काढावा. पातेल्यातल्या कांद्यात कोळंबीचे मिश्रण ८०% चांगले परतून परतून शिजवून घ्यावे. कोळंबी ८०% शिजल्यावर त्यात वर ७०% शिजलेला अर्धा बासमती भट घालावा. दुसऱ्या लेअर वरतळलेली लहान बटाटी घालावी. पुन्हा भात घालावा. ४ लेअरवर तळलेला कांदा घालावा. पुन्हा भात घालावा. वरून हवी असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडावी. आता वर झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे आणि १५ मिनिटे मंद आचेवर कोळंबी भात शिजवून घ्यावा. १५ मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि गरमागरम कोळंबी भात सर्व्ह करावा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद ! Background music & Credit - Beach Party - Islandesque by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/...) Source: http://incompetech.com/music/royalty-... Artist: http://incompetech.com/

Comments