Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Shri Swami Samarth Temple Akkalkot | श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट в хорошем качестве

Shri Swami Samarth Temple Akkalkot | श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Shri Swami Samarth Temple Akkalkot | श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट

#Shri_Swami_Samarth #Temple #Akkalkot Shri Swami Samarth Temple Akkalkot solapur | श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट सोलापूर | भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावात मठ आहे. अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय आहे. अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येथे राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजे होऊन गेले. अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेलीया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. ३०० वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले. एका लाकूड तोड्याने झाडतोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले. फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले. तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे. त्यांचे वास्तव्यनेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजतासमाधी घेतली. पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे. चोळप्पाच्याघराजवळ समाधीमंदिर असून, त्यातश्रींनी दिलेल्या पादुका आहेत. अक्कलकोटसंस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. तीविकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला. धारवाड जिल्ह्यातील (कर्नाटकराज्य) श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या ३० व्यावर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले. श्रींनीअनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले, "माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर. तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा. म्हणजे चांगले फळ मिळेल." त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला. प्रस्तुतमठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळप्पांनीश्रीसमाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तीध्वज फडकविण्याचा मान मिळविला. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनी ती धुरा वाहून नेली. यामठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात. श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार, जमीनविकून मंदिर बांधले. श्रीसमाधिस्थहोण्यापूर्वी जोतिबाने श्रींना विचारले, "माझे कसे होईल?' श्रीम्हणाले, "तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निध आहे." श्रींच्या हयातीत जोतिबाने 15 वर्षेव समाधीनंतर 41 वर्षेअनन्यभावे सेवा केली. आजमंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून, त्यांचेशिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे. अशीही गुरुशिष्यांची जोडी आहे. आताया मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्याभाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाचीव्यवस्था, खोल्यादेऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, "आमचे नाव नृसिंहभान - दत्तनगरमूळ' त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात. Follow me on:- facebook :   / umeshmahadik57   Instagram :   / umeshmahadik7   Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik YouTube :    / umeshmahadik   Blogger : https://umeshmahadik.blogspot.com Twitter :   / mahadik14   If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT. #mandir #dev #devdarshan #god #goddess #dev #swami_samarth #स्वामी_समर्थ #gurumauli #मठ #मंदिर #अन्नछत्र Title: India Music: www.bensound.com Genre: World Mood: Inspirational Download: https://goo.gl/1aXwE3

Comments