Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб स्वामी महाराजांनी जवळ बसून मंत्र सेवा करवून घेतली🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ в хорошем качестве

स्वामी महाराजांनी जवळ बसून मंत्र सेवा करवून घेतली🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



स्वामी महाराजांनी जवळ बसून मंत्र सेवा करवून घेतली🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ आज प्रगट दिन. 'सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास. और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज. इ.स.१४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली. व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला. व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्य करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज २०२४ मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कूणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या. अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्या सोबतच. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन. पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना. अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ एक ॐ कार सदगूरू 🛕🔱🪔🚩 🍁🌈🛕⛱️🍁

Comments