Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Padmadurg Fort aka Kasa Fort | Padkot | पद्मदुर्ग ऊर्फ कासा | पडकोट в хорошем качестве

Padmadurg Fort aka Kasa Fort | Padkot | पद्मदुर्ग ऊर्फ कासा | पडकोट 4 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Padmadurg Fort aka Kasa Fort | Padkot | पद्मदुर्ग ऊर्फ कासा | पडकोट

पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत. पद्मदुर्ग जवळ असलेल्या जंजिरा किल्ला मुळे सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता. सिद्धी च्या अत्याचाराला थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूडच्या समुद्रामध्ये कासव आकाराच्या असलेल्या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. पद्मदुर्ग किल्ला चे दुसरे नाव कासा किल्ला असे पण म्हणतात. पद्मदुर्ग किल्ल्याचे बांधण्याचे काम 1676 मध्ये झाले. पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की, “पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे. या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी. एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य माणसाला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून मुख्य किल्ल्याकडे गेल्यावर पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो. पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली दिसतात. तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो. Padmadurg, also known as Kasa fort, is one of five historical sea forts built by Chhatrapati Shivaji Maharaj and located in Raigad District Maharashtra, India. It was built by the Marathas to challenge another seaport, Janjira which was controlled by the Siddis. Padmadurg was one of the sea forts built by Chhatrapati Shivaji Maharaj in 1676 in order to control the naval activities in the Arabian sea. It is located in the northwest direction of the Janjira fort at a distance of about 4 km.[2] Padmadurg, along with Underi fort, was re-captured by the Marathas (under Raghuji Angre) from the Siddis of Janjira in 1759.During cleanup activities in 2012, ASI authorities found around 250 cannonballs of historical value. The sea fort of Padmadurg is not as big as Janjira but still the fort can be visited and enjoyed. Visiting the fort requires taking permission from the Customs/Navy. The fort was not only a part of Sindhudurg's defenses but was also Chhatrapati Shivaji Maharaj's main ship construction yard. This fort can also be viewed from Janjira. There was a belt of land from Dandi seashore to Padmadurga but it got blown away under the water in 2004. This fort can be accessed by boats. Boats are mainly available from Murud-Koliwada. padmadurg fort padmadurg sea fort padmadurg sea fortress history of padmadurg padmadurg wikipedia padmadurg kasa fort padmadurg padmadurg fort info in marathi padmadurg fort info in english padmadurg fort information in marathi padmadurg fort information in english padmadurg fort murud padmadurg murud padmadurg sea fort padmadurg killa murud padmadurg killa fort murud fortress history of padmadurg kasa killa kasa fort padkot padkot killa padlot fort padkot murud maharashtra trekking places hidden waterfall sahyadri maharashtra travel trending tourist places satara travel satara tourist places in marathi summer tourist places in satara pune places places to visit in maharashtra in summer best staycation in maharashtra places to visit in thane marathi travel vlog

Comments