У нас вы можете посмотреть бесплатно ऐणारी पांडवकालीन गुफा Ainari Caves Vaibhavwadi Pandavas caves или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
कोकणातील_एक_रहस्य . . . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश.. येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत. ही गुहा सह्याद्रीत झाकून गेली होती. ऐनारीच्या ग्रामस्थांनी एकत्र होत श्रमदानाने गुहेच्या प्रवेशद्वारावरची माती मोठय़ा कष्टाने बाजूला करत गुंफेचे तोंड खुले केले. गुहेचे अंतर्गृह वैशिष्टय़पूर्ण आहे. आत शयनगृह आहेत. पाण्याची कुंडे आहेत. १२ खांबांचे सभागृह आहे. शेजारी ६ शयनगृह बरोबर समोर गर्भगृह, त्याच्या शेजारी आणखी एक छोटीशी जागा. प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा. प्रत्येक खांबामध्ये १० फुटांचे अंतर आणि खांबाचा व्यास दोन फूट अशी रचना आज दृष्टीस पडते. ही गुहा गेली काही वर्षे बुजली गेली. आता खांबाची उंची १२ फूट मिळते; परंतु अंतर्गृहात हीच उंची १४ फूट मिळते. शयनगृहात दगडी पलंग आहेत. शेजारी पाण्याची कुंडे आहेत. अंतर्गृहात प्रकाशाची व्यवस्था कुठे दिसत नाही. परंतु गुहेपासून २० फुटांवर पाण्याची विहीर आहे. कडय़ाला उभा छेद मारून खोदण्यात आलेल्या विहिरींच्या काटकोनात थेट भुयार काढण्यात आले आहे. या भुयारांचे एक टोक गुहेत संपते. याच मार्गाने वातानुकूलित व्यवस्थापन करण्यात आले होते हे स्पष्ट होते. अर्धा डोंगर डोक्यावर घेऊन हजारो वर्षापूर्वी खोदलेली ही गुहा पांडवांची आहे असा एक समज आहे. गुहेपासून हाकेच्या अंतरावर मोठी शिळा आहे. पांडवांनी गुहेचे काम सुरू असताना पहाट होण्यापूर्वी आपल्याला सांगावा धाडावा असे एकाला सांगून त्याची रवानगी टेकडीवर केली होती. मात्र पहाट झाली तरी तो तेथेच झोपून राहिला म्हणून क्रोधीत होऊन भीमाने त्या टेहेळणीसाठी ठेवलेल्या माणसाची मान धडावेगळी केली. त्याचीच ती शिळा अशी आख्यायिका आहे. ऐनारीला कसे जावे.. मुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून चार कि. मी. आत ऐनारी गाव आहे. या गावापासून सह्याद्रीत जाणारी पायवाट आहे. ही पायवाट थेट ऐनारीकडे पोहोचते. समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असणा-या या गुहेकडे जाण्यासाठी सध्या असणारी पायवाट प्रचंड बिकट आहे. तरीही आपल्या गावातील गुहा बघायला बाहेरचे कुणी आले आहे असे समजल्यावर येथील ग्रामस्थ मोठय़ा आनंदाने गुहा दाखवायला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करायला पुढे असतात. ऐनारीच्या कुशीत आश्चर्य #ainari #caves #wildcaves #maharashtratourism #tejaspatekarvlogs #kokan #maharastra #temple #sindhudurg #konkan #ऐनारी #Pandavascaves #कोकणातील_एक_रहस्य