Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kaneri Math Part 4 | Shiv Mandir| Prerna Theam Park| कणेरी मठ भाग ४। शिवमंदिर। प्रेरणा थीम पार्क। в хорошем качестве

Kaneri Math Part 4 | Shiv Mandir| Prerna Theam Park| कणेरी मठ भाग ४। शिवमंदिर। प्रेरणा थीम पार्क। 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kaneri Math Part 4 | Shiv Mandir| Prerna Theam Park| कणेरी मठ भाग ४। शिवमंदिर। प्रेरणा थीम पार्क।

Kaneri Math Part 4 | Shiv Mandir| Prerna Theam Park| कणेरी मठ भाग ४। शिवमंदिर। प्रेरणा थीम पार्क। महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर येथील कणेरी मठ श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कणेरी प्रसिध्द आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. त्यामुळे भाविकांचे समाधान होऊन मन:शांती प्राप्त होते. भारत देशास एक इतिहास असून संस्कृती टिकून ठेवण्याचे कामही अन्य मठाबरोबरच या मठात होते. हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे. कोल्हापूर जिल्हा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुण्यमय प्रदेश आहे. या जिल्ह्याला धार्मीक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठेची पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्याला पर्वत प्रदेश, वनसंपदा, वनस्पतीसंपदा, जलसंपदा उदंड लाभलेली आहे. या ठिकाणी घनदाट वनराई आहे.पुरोगामीत्वाची वेगळी अशी ओळख आहे. काडसिध्देश्वर हे सांप्रदायाचे मुळ स्थान कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाला लागून असणारे सिध्दगिरी क्षेत्र अत्यंत पुरातन, धार्मीक व अध्यात्मिक पीठ आहे. याची ओळख जगद्गुरु काडसिध्देश्वरांचा मठ अशी आहे. जवळच कणेरी गाव आहे. म्हणूनच त्याला कणेरी मठ असेही म्हणतात. कणेरी हे गाव सिध्दगिरी मठाच्या कुशीत वनराईने वसलेले आहे. गावाला 11 व्या शतकापासून 900 वर्षांचा इतिहास आहे. हे अनेक गावांचे श्रध्दास्थान असून येथे साधु, महंतांसह अनेक नामवंत दर्शनासाठी येतात. या मठाच्या अधिपत्याखाली सुमारे छोटे-मोठे 200 मठ असून ते महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदि भागात विखुरलेले आहेत. जगतगुरु काडसिध्देश्वर हे हेमांडपंथी शिल्पकेलेचे भव्य शिवमंदीर आहे. या मठात महाशिवरात्री, श्रावण सप्ताह,प्रतिमास पौर्णिमा,गुरूपौर्णिमा तसेच गुरु आराधना आणि श्री काडसिध्देश्वर यांचा पालखीचा सोहळा आदि उत्सव साजरे केले जातात. यामध्ये लाखो भाविक श्रध्देने सहभागी होतात. त्यावेळी त्यांना सत्संग, प्रवचन, प्रबोधन केले जाते. या काडसिध्देश्वरांची पहाटे पाच वाजता, सकाळी अकरा वा., दुपारी दोन वा. आणि संध्याकाळी सात वा. अशी दिवसातून चतुष्काल पूजा होते. मंदिरात नित्य रुद्राभिषेक चालतो. भाविकांसाठी या मठात सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत बाराही महिने अन्नछत्र चालू असते. मठाभोवतीने दगडी तटबंदी आहे. मठाच्या मध्यभागी सिध्देश्वरांचे देवालय आहे. त्याच्या भोवती समाधी, अडकेश्वर, चक्रेरश्वर, रुद्रपाद देवालयेही आहेत. येथील प्रमुख निलगार हे लिंगायत आहेत. त्यांना आपल्या सणांच्या वेळी, धार्मीक विधी, ध्यानाच्या वेळी आणि सामाजिक कार्यात या मठाचे महत्व प्राप्त झाले आहे. ब्रम्ह्मलीन जगद्गुरु श्री मुप्पिन काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी मठ पूर्वीप्रमाणे सर्व जातीधर्मांसाठी खुला केला आहे. हे स्वामी महाराज म्हणजे चालते-बोलते वेदांत! त्यांनी वर्णभेद, वर्गभेद, लिंगभेदसाठी समाजाचा रोष ओढवून घेतला खरा पण ते विचलित झाले नाहीत. आपल्या मठाच्या परंपरेनुसार उत्तराधिकाऱ्यांची निवड योग्यतेच्या आधारावर केली आणि खरे संन्याशी म्हणून राहिले. पुरोगामीत्वाची खऱ्या अर्थाने जाणीव त्यांनी समस्त समाजाला करुन दिली. त्यांच्या या कार्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. हा संस्थान मठ असून सध्या 200 ते 300 एकर जमीन मठाकडे आहे. संस्थांनाप्रमाणे सर्व प्रकारचे वैभव या मठाला आहे. त्याच्या पाठीमागे पश्चिमेला उजव्या बाजूस मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचे समाधीस्थान व गुरुदेव ध्यान मंदीर आहे. येथे साधकांना ध्यानधारणा करण्यारिता पोषक व पुरक वातावरण असल्याची अनुभूती त्यात प्रवेश केल्याबरोबरच येते. मुख्य मंदिरांच्या बाजूस श्री सिध्दरामेश्वर महाराजांची प्रतिकात्मक समाधी असलेला मंडप आहे. मंदीराच्या बाहेरील बाजूस जलमंदीर असून ते आलेल्या भाविकांची तृष्णा तृप्त करीत आहे. पाणपोईच्या मागील बाजूस पंचकर्म चिकित्सालय आहे. येथे जुन्या असाध्य अशा आजारांवर इलाज करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म पध्दतीने उपचार केले जातात. याच शेजारी दोन क्राँक्रीटचे महाकाय हत्ती यात्रेकरुचे लक्ष वेधून घेत आहेत. पायऱ्या उतरल्यानंतर महाकाय नंदी व पिंडीच्या आकाराच्या छोटया मंदीरावर 25 फूट उंचीची शंकराची मुर्ती सगळयांना आकर्षून घेते. पश्चिमेस भक्तमंडळींची राहण्याची सोय व्हावी म्हणून भक्तनिवास आहे. तेथेच प्रसादनिलय व अतिथीगृह आहेत. भक्तांसाठी दोन भव्य प्रवचन मंडप आहेत. या उत्तम सांगड घालून ते मठाचा कार्यभार सांभाळत आहेत. #kanerimath #prernatheampark #shivmandir #kishoraanicompany #kolhapur #shivatemple

Comments