Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | कोकण गौरी गणपती в хорошем качестве

गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | कोकण गौरी गणपती 4 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | कोकण गौरी गणपती

#कोकणातीलपारंपरिकसहनगणपती #गौरीपूजन #ओवसा #villagelife #gauriganpati #gauriganpatisan #gaurichasan #ganpatibappa #ganeshustav गौराई आली सोनपावली आली ओवसा ववसा भारुयात | गौरीगणपतीचा सण #ओवसा    • गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात...   गौरीगणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरी स्थापना केली जाते. गौरीला गणपतीच्या आईचे रूप मानले जाते. त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. ज्यामुळे तिचा पाहुणाचार त्याप्रमाणेच केला जातो. गाजत वाजत गौराईला घरी आणले जाते, गौरीला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते, गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मींची पुजा केली जाते. कोकणातील काही भागात गौरीपुजनामध्ये ‘ओवसा’ ही एक परंपरा दिसून येते. ‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात. विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पुर्व नश्रत्रांंमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पुर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो.

Comments