Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नाशिक जिल्हा संपूर्ण माहिती / Nashik District Information / Nashik City Tourist Places в хорошем качестве

नाशिक जिल्हा संपूर्ण माहिती / Nashik District Information / Nashik City Tourist Places 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नाशिक जिल्हा संपूर्ण माहिती / Nashik District Information / Nashik City Tourist Places

#DigvijayMali #Maharashtra_Heritage Disclaimer - video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright act 1976, allowance is made for "fair use" for a purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. nashik drone nashik city nashik city tour nashik city tourist places nashik city centre mall nashik district information in marathi nashik district taluka list in marathi nashik district fort nashik mahiti nashik maharashtra nashik maharashtra tourist places nashik maharashtra police academy nashik highway nashik history nashik history in marathi pandavleni nashik history history of nashik history of nashik city nashik panchavati darshan nashik dhol nashik vishe mahiti nashik jilla vishe mahiti nashik famous food places nashik all information नाशिक माहिती नाशिक जिल्हा माहिती नाशिक जेल माहिती नाशिक जिल्ह्याची माहिती नाशिक जिल्हा पर्यटन स्थळे नाशिक जिल्हा तालुके nashikkar लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ३ र्‍या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा परिचित आहे. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,582 चौरस किमी इतके असुन येथिल लोकसंख्या ६१ लाखाहून अधिकची आहे.भगवान राम, लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते येथेच लक्ष्मणाने शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक कापले होते संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे. तर मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते एवढेच नाही तर नऊ शिखरांचे शहर” म्हणून “नवशिख” आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आढळून येतो याशिवाय जनस्थान, त्रिकंटक नावाने ओळखला जातो. दक्षिण भारताची गंगा म्हणून प्रचलित असलेली व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदीचा मान मिळवलेली गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्व‍तावर झालेला आहे गोदावरी व्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्वाच्या नद्या नाशिक मधून वाहतात. नाशिक जिल्ह्याला धुळे, जळगांव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, गुजरातचे वलसाड, नवसारी आणि डांग जिल्ह्याची सीमा लागून आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर नाशिक जिल्ह्या हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून सर्वदूर ओळखला जातो. wine capital of india नाशिक जिल्ह्याचे कमाल तापमान ४१.९ सेल्सीअस तर किमान तापमान ८.०७ सेल्सीअस इतके आहे. तर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची 565 मीटर इतकी आहे. जिल्हयातील पश्चिम भागातील इगतपुरी, सुरगाणा व पेठ तालुक्यात २००० मि.मि.इतका पाउस पडतो मात्र पूर्वेकडे याचे प्रमाण एकदम कमी कमी होत जाते. सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड आदी भाग विदर्भ विभागा सारखे असल्यामुळे नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यात काळाराम मंदिर, धम्मगिरी, रामकुंड, श्री सोमेश्वर मंदीर, पांडव लेणी, पंचवटी, मांगी तुगी मंदीर, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर, गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले देशातील पहिले मातीचे धरण, सापुतारा हे निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण, नांदूर मध्यमेश्वर येथिल भरतपुर अभयारण्य, भोजापूर येथील खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर , सिन्नर ही यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी, साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेले सप्तश्रुंगी माता, मालेगाव येथील पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला आदी अनेक पर्यटनस्थळे नाशिक जिल्ह्यात आहेत. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक असून याठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरत असतो तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशावलीची नोंदणी केली जाते. नाशिक जिल्ह्यात बागलाग - सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, त्र्यंबकेश्वर असे एकूण १५ तालुके आहेत.नाशिक जिल्ह्यात सह्याद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदवड, सातमाळा रांगा आणि मालेगावचे पठार आदी पर्वत डोंगररांगा आहेत. तर ब्रह्मगिरी, साल्हेर मुल्हेर , अंकाई टंकाई, मंगिया–तुंगिया आदी अनेक महत्वाची जोडकिल्ले येथे आहेत याच नाशिक जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI), महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी, चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना, ओझर येथे मिग विमानाचा कारखाना, इगतपुरी येथे निलगिरीपासून कागदनिर्मिती कारखाना, तर देवळाली येथे सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. याच ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला , तर सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची कर्मभूमी होय ! तर येवले हे शहर तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. तर भगूर हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान आहे. नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नद्यांच्या खोर्‍यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग असून जिल्ह्यात वाहणार्‍या सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात.

Comments