Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб घोडबंदर किल्ला संवर्धनासाठी समस्त दुर्गमित्रांचे महत्वपूर्ण श्रमदान в хорошем качестве

घोडबंदर किल्ला संवर्धनासाठी समस्त दुर्गमित्रांचे महत्वपूर्ण श्रमदान 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



घोडबंदर किल्ला संवर्धनासाठी समस्त दुर्गमित्रांचे महत्वपूर्ण श्रमदान

घोडबंदर किल्ला संवर्धनासाठी समस्त दुर्गमित्रांचे महत्वपूर्ण श्रमदान"* 🚩🚩 दिनांक २ डिसेंबर २०१८ रविवार रोजी मीरा भाईदर प्रांतातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनासाठी किल्ले वसई मोहीम परिवार, आगरी समाज एकता मीरा भाईदर, युवा प्रतिष्ठान मीरा भाईदर, स्थानिक शिवप्रेमी दुर्गमित्र मंडळ यांनी एकत्रितपणे श्रमदान केले. सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत दुर्गमित्रांनी गडावरील मुख्य बालेकिल्ला व त्यास जोडून असणाऱ्या संरक्षक तटबंदीच्या संवर्धनासाठी कष्ट घेतले. सदर बालेकिल्ला व संरक्षक तटबंदीवर अनावश्यक व तटबंदीस धोकादायक असणारी काटेरी झाडे, झुडुपे आज दुर्गमित्रांनी स्वच्छ केली. घोडबंदर गावातील स्थानिक शिवप्रेमी दुर्गमित्रांनी संवर्धनासाठी तीन शिड्या उपलब्ध करून मोलाची मदत केली. किल्ले वसई मोहिमेचे आतिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर श्रमदान मोहीम पूर्णत्वास गेली. आजच्या मोहिमेत मुख्य बालेकिल्याच्या तिन्ही अंगास असणारी काटेरी झाडी झुडुपे स्वच्छ करण्यात आली. तसेच मुख्य प्रवेशद्वारात असणारी सैनिकांची बैठक व्यवस्था झाडीतून मुक्त करण्यात आली. बालेकिल्याच्या मागील अंगास असणारी व सध्या बऱ्याच प्रमाणात नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी भक्कम चिरेबंदी तटबंदी अनावश्यक झाडीतून मुक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी किल्ले वसई मोहीम अंतर्गत घोडबंदर किल्ल्यातील वास्तूचा वास्तुवैभव नकाशा तयार करण्यात आलेला होता. आज स्थानिक दुर्गमित्रांच्या मदतीने व इतिहास अभ्यासक श्री श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास मार्गदर्शन सफर व वास्तू शोध मोहीम करण्यात आली. यात स्थानिक दुर्गमित्रांनी घोडबंदर किल्ल्यातील जागोजागी विखुरलेले संरक्षक तटबंदीचे अवशेष शोधण्यासाठी मदत केली. तब्बल पाच तास झालेल्या आजच्या संवर्धन मोहिमेत स्थानिक युवकांचा सक्रिय सहभाग मोलाचा ठरला HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra. Contact us to report any new as a citizen reporter on 9545056667 or [email protected] घोडबंदर किल्ला संवर्धनासाठी समस्त दुर्गमित्रांचे महत्वपूर्ण श्रमदान #portuguese #घोड़बंदरकिला #bhayander #portuguesenavy #ghodbunderroad #fortsofthane #historicalplace #mumbaifort #Ghodbunderfortthane #Fort #Ghodbunder

Comments