Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कृषि यांत्रिकीकरण योजना | krushi yantrikikaran yojana maharashtra 2023 в хорошем качестве

कृषि यांत्रिकीकरण योजना | krushi yantrikikaran yojana maharashtra 2023 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कृषि यांत्रिकीकरण योजना | krushi yantrikikaran yojana maharashtra 2023

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ==================================================================== 👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे. ✅आजचा विषय - 🌱कृषि यांत्रिकीकरण योजना | krushi yantrikikaran yojana maharashtra 2023👍 1️⃣कृषि यांत्रिकरण योजना 2023 - नमस्कार शेतकरी मित्रानो, आपण शेती करत असताना शेतीकामाच्या वेळी मजुरांचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. मजूर हे वेळेवर भेटत नाहीत आणि भेटलेच तर मजुरीचे दर व त्यामुळे शेतीसाठी येणारा खर्च बराच प्रमाणात वाढलेला आहे. परिणामी शेतीतून मिळणारे उत्पन्न हे फार कमी येत असल्यामुळे शेती करणे आजच्या वेळी खूप कठीण झालेले आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे “राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2023” हि योजना चालू केली आहे. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे. 2️⃣आवश्यक कागदपत्र - 1. शेतकर्‍याचे आधारकार्ड. 2. बँकेचे पासबूक. 3. 7/12 आणि 8 अ. 4. यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल. 5. जातीचा दाखला ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी ) 6. स्वयं घोषणापत्र. 7. पूर्वसंमती पत्र. 3️⃣पात्रता - 1. शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. 2. शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी. 3. अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 4. ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकर्‍याच्या नावावर ट्रॅक्टर असावे. 4️⃣योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणारे कृषी यंत्र/अवजारे - 1. ट्रॅक्टर 2. पावर टिलर 3. ट्रॅक्टर/पावर टिलर चलित अवजारे 4. मनुष्य चलित यंत्र/अवजारे 5. बैलचलित यंत्र अवजारे 6. प्रक्रिया संच 7. कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र 8. फलोत्पादन यंत्र/अवजारे 9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र/अवजारे 10. स्वचलित यंत्रे 5️⃣अर्ज कुठे करावा ? अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G 👉वेबसाइट - www.bharatagri.com 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Comments