У нас вы можете посмотреть бесплатно भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली | Dr. Babasaheb Ambedkar Smarak, Airoli или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली | Dr. Babasaheb Ambedkar Smarak, Airoli भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा १ नोव्हेंबर २०१४ रोजी लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. संरचना संपादन अडीच एकरांच्या या भूखंडावर स्मारक उभे आहे. मुख्य सभागृह, खुला सभामंडप आणि प्रार्थनागृह अशी रचना असून त्यात कलादालन, ग्रंथालय, कॅफेटेरीया आणि बाहेर असलेल्या विद्युत जनित्राच्या जागी हिरवळ तयार करण्यात आली आहे. यासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. स्मारकास मार्बल आच्छादन लावण्यात आले आहे. ५७५० चौ. मी. क्षेत्रफळावर ऐरोली सेक्टर १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्य वास्तू उभारण्यात आली असून यामध्ये शिक्षण आणि ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत असा संदेश प्रसारीत करणारा पेनच्या निबच्या आकाराचा डोम उभारण्यात आलेला आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीची डोमसह उंची ५० मीटर इतकी असून डोमच्या खाली पहिल्या मजल्यावर ३२५ चौ.मी. क्षेत्रफळाचे साधारणत: ३०० नागरिकांना ध्यानसाधना (मेडिटेशन) करता येईल असे प्रार्थना स्थळ विकसित करण्यात आले आहे. याशिवाय या वास्तूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तूंचे वस्तू संग्रहालय, कला दालन, दोन वाचनालये व अभ्यासिका, बहुउद्देशीय सभागृह, पोडीयम गार्डन अशा कल्पक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी भूखंडाचे क्षेत्रफळ: ५७५० चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळ: २३१० चौरस मीटर मुख्य हॉल - ३०० चौ.मीटर कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटर सर्विस एरिया - १७२ चौ.मीटर व्हीआयपी रूम व कार्यालय - ६४ चौ.मीटर पोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटर खुले सभागृह - ८५६ चौ.मीटर प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटर वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटर कलादालन - १३४ चौ.मीटर कॅफेटेरिया - ११४ चौ.मीटर वाचनालय - ११४ चौ.मीटर वॉटर बॉडी - २७५ चौ.मीटर डोम - ४९ मीटर उंच अतिशय सुंदर असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधलेले आहे. आपण सर्वानी या वरील स्मारकाला सहपरिवार भेट द्या. वरील स्मारक बघण्यासाठी कोणतीही शुल्क घेतले जात नाही. सर्वासाठी मोफत आहे. वरील स्मारक बघण्यासाठी आपण हार्बर लाईन ट्रेननी वाशी /ऐरोली जाऊ शकता. तसेच मध्य लाईन रेल्वे ( सेंट्रल रेल्वे ) ट्रेननी ठाणे / ऐरोली जाऊ शकता. ऐरोली स्टेशन वरून वरील स्मारक जाण्यासाठी रिक्षानी जाऊ शकता. आपण स्टेशन वरून चालत गेलात तर 10 ते 15 मिनिटे चालायला लागतात. वरील स्मारक ऐरोली सेक्टर - 15 मध्ये आहे. ---------------------------------------------------------------------------------- तसेच वरील स्मारक बघुन झाल्यानंतर आपण तिथुनच पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या चिंचोली गार्डन, ऐरोली सेक्टर - 5 ला, चिंचोली गार्डन आहे. ह्या गार्डन मध्ये जपानी पुतळे ( स्टॅच्यू ) आणि विविध वस्तूं जपानी पद्धतीच्या तेथे लावण्यात आल्या आहेत. हे हि आपल्याला बघायला मिळेल . धन्यवाद... 🙏🏻