У нас вы можете посмотреть бесплатно Hampi The Capital of VIJAYNAGAR Empire | हंपी विजयनगर राजधानी | संपूर्ण माहिती или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
हंपी १४व्या शतकात हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. या शहराभोवती रक्षणासाठी तटबंदी होती. फारसी आणि युरोपीय प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिहासवृत्तात असे म्हणले आहे की हंपी हे तुंगभद्रा नदीजवळचे एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते, ज्यामध्ये असंख्य मंदिरे, शेती आणि व्यापारी बाजार होते. हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे.[२] अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक "किल्ले, नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा" समावेश आहे.[३] यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान (austere, grandiose site) असे केले आहे. हंपी नावाची व्युत्पत्ती पंपापासून आहे. पंपा हिंदू देवी पार्वतीचे एक नाव आहे. पौराणिक कथेनुसार पार्वतीने (जी शंकराची पूर्वीची पत्नी सतीचा पुनर्जन्म आहे) शंकराशी लग्न करण्याचा संकल्प केला.[६][७] तिच्या आईवडीलांनी हे कळल्यावर त्यांनी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु पार्वतीने आपला हट्ट सोडला नाही. योगसाधनेत गर्क आणि जगापासून परावृत्त अशआ शंकराला जागृत करण्यासाठी आणि त्यांचे लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी पार्वतीने देवतांना मदतीसाठी आवाहन केले. देवराज इंद्राने शंकराला ध्यानातून जागृत करण्यासाठी कामुक प्रेम आणि आकर्षणाचा देव कामदेव यास पार्वतीच्या मदतीस पाठवले. कामदेवाने शंकरावर कामबाण सोडल्यावर शंकर विचलित होतो.[६][७]. तपस्या भंग झाल्याने क्रोधित झालेल्या शंकराने आपल्या कपाळावरचा तिसरा डोळा उघडून कामदेवाला जाळून राख करून टाकले. यानंतरही पार्वतीने निराश न होता शंकराचे प्रेम मिळविण्यासाठी त्यांच्याच सारखे तपस्वी जीवन जगणे सुरू केले. शंकराने पार्वतीच्या संकल्पामागचे कारण व तिचे खरेच आपल्यावर प्रेम आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी वेषांतर करून पार्वतीची भेट घेतली आणि शंकराच्या (स्वतःच्याच) क्रोधी, रागीट स्वभाव, त्याचे जंगलात भणंगासारखे राहणे, संसाराकडे बिलकुल लक्ष नसणे, इ. नकारात्मक गोष्टींचे वर्णन केले. त्यायोगे पार्वती आपला नाद सोडून देईल असे त्यास वाटत असते.[६][७] हे सगळे ऐकूनसुद्धा पार्वती आपल्या निश्चयावर ठाम राहते. पार्वतीच्या संकल्पामागे प्रेम आणि आदर असल्याचे कळल्यावर भगवान शिव शेवटी तिचा स्वीकार केला आणि त्यांनी लग्न केले.[६][७] शिव आणि पार्वतीच्या विवाहानंतर कामदेवाला नंतर जिवंत करण्यात आले. स्थल पुराणानुसार, पार्वती (पम्पा) हिने तपस्वी शिवाला जिंकण्यासाठी आणि गृहस्थ जीवनात परत आणण्यासाठी हेमाकुटा टेकडीवर, आता हंपीचा एक भाग असलेल्या, तिच्या तपस्वी, योगिनी जीवनशैलीचा पाठपुरावा केला.[८] शिवाला पंपापती (म्हणजे "पंपाचा पती") असेही म्हणतात.[८] हेमाकुटा टेकडीजवळील नदी पंपा नदी म्हणून ओळखली जाऊ लागली.[९] पम्पा हा संस्कृत शब्द, कन्नड शब्द हंपा मध्ये बदलला आणि पार्वती ज्या ठिकाणी शिवाचा पाठलाग करत होती ते ठिकाण हम्पे किंवा हम्पी म्हणून ओळखले जाऊ लागले.[८][९][१०] Music Credit : • Healing Ragas || Rag Hamsadwani - Sit... • Healing Ragas - Sitar Tabla - Brindav... • South Indian Classical Music - Mandol...