Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб गौरवगाथा:- उंच 'ती' ची सावली...! | Malegaon | Inspiration Story | Kalyani Bhadane в хорошем качестве

गौरवगाथा:- उंच 'ती' ची सावली...! | Malegaon | Inspiration Story | Kalyani Bhadane 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



गौरवगाथा:- उंच 'ती' ची सावली...! | Malegaon | Inspiration Story | Kalyani Bhadane

स्पर्धा परीक्षेची अभ्यास करण्यासाठी आता अनेक मुलं-मुली रात्रीचा दिवस करून परिश्रम करत असतात. यामध्ये अनेकजण आपलं कुटुंब, घरदार सोडून शहराच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात तर बरेच विद्यार्थी हे गावात राहून आपला कामाचा व्याप सांभाळून अभ्यास करतात. या सगळ्या प्रकियेत मुलींचा सहभाग देखील मोठा आहे. स्पर्धा परीक्षेत आज अनेक मुलींनी बाजी मारली आहे. आता अशाच एका हुनरबाज मुलीची यशोगाथा पाहणार आहोत. मूळची बागलाण तालुक्यातील खिरमानी गावची मात्र मालेगाव स्थित कल्याणी संजय भदाणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक नगर रचनाकार परीक्षेत महाराष्ट्र आठवा तर मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवीत तिने स्वर्गीय वडिलांचे स्वप्न जिद्दीने पूर्ण करीत श्रद्धांजली वाहिली आहे. कल्याणी हिचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण मालेगाव येथील मसगा महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने पुणे येथे बी टेक (शहर नियोजन) चे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. तिचे वडील स्व.संजय भदाणे मालेगाव येथील वीज वितरण कार्यालयात कार्यरत होते आठ वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले मात्र त्यांचं स्वप्न होते की, माझ्या मुलीने अधिकारी व्हावे त्यांचे स्वप्न कल्याणीने कठोर मेहनतीने पूर्ण केले आहे. परिश्रम व अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तिने अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. - योगेश आर.बच्छाव, सोनज (७५१७२६८५००) (मुलाखतकार : श्री.घनश्याम आहिरे, दाभाडी) (सहकार्य : कल्याणी भदाणे, करन भदाणे व परिवार) #dream #inspiration #officer

Comments