Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सौ. विमलाबाई गरवारे पथक - परिचय :उत्तरार्ध (सामाजिक उपक्रम) в хорошем качестве

सौ. विमलाबाई गरवारे पथक - परिचय :उत्तरार्ध (सामाजिक उपक्रम) 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सौ. विमलाबाई गरवारे पथक - परिचय :उत्तरार्ध (सामाजिक उपक्रम)

"वादनासाठी एकत्र न येता, एकत्र येण्यासाठी वादन" हे ब्रीद वाक्य मानून गरवारे महाविद्यालयात गणेशोत्सव उपक्रमाची सुरुवात आणि पथकाची स्थापना सण १९७६ रोजी कै. अनंतराव गाडगीळ सरांनीकेली, तेव्हा पासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. सरांना वादनाची आवड होतीच सोबत प्रशालेचे इतर उपक्रमही सर मोठ्या उत्साहाने पार पडायचे. सुरवातीला भावे हायस्कुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या सर्वांना परिचित असलेल्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या पटांगणातच दरवर्षी चालू असतो. पुण्यातील शालेय पथकांच्या परंपरेतील एक पथक. पथक जरी शाळेच असलं तरी शाळेच्या या उपक्रमात सर्व तरुण मुले सहभागी होतात. लयबद्ध वादनाच्या चाली, त्या चालींवर तेवढ्यच उत्साहात प्रात्यक्षिक करणारा प्रशालेतील विद्यार्थ्यंचा टिपरी आणि ध्वजाचा गट हे पथकाचे वैशिष्ट्य. कालानुरूप अनेक नवीन चाली, प्रात्यक्षिकांचे प्रकार पथकाच्या वादनात समाविष्ट होत गेले. पथकाचा अविभाज्य भाग म्हणजे १२ फुटी ध्वज गट हा या उपक्रमाचं सोनेरी कळस. १२ फुटि ध्वज, टिपरी नृत्य, ८ फुटि ध्वज गट व वाद्य पथक हे सर्व मिरवणुकीत एकरूप होऊन जाते. नाविन्य, मग ते वादनात असेल अथवा पथकात कायमच जोपासल गेले आहे. २००१-२००२ मध्ये पथकाने संपूर्ण नविन वादन बसवले आणि विविध ठिकाणी प्रात्यशिके घेतली आणि स्थिरवादनाचा पायंडा पाडला. २००६-२००७-२००८ साली Zee Television ने आयोजित केलेल्या राज्यस्थरिय ढोल ताशा स्पर्धा मध्ये घवघवीत यश मिळवले, व दमदार वादनाने एकूणच स्पर्धेवर छाप उमटवला. नवीन ठेके, ताल, बोला़ची सांगड, आणि त्या सगळयांच समक्रमण (Synchronization), हे अव्याहतपणे वादन चालू ठेवतानाच बदलत्या काळानुसार 2011 पासून नाविन्यपूर्ण अशा तालरचना प्रथमच वादनात समाविष्ट केल्या ज्यांचा प्रभाव आज आपल्याला ठिकठिकाणी दिसून येतो. पथकातील वादक, वादना बरोबरच बाकी सामाजिक उपक्रमात सुध्दा उत्साहाने सहभागी होतात. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या उपक्रमांना आर्थिक मदत व त्यांच्या उपक्रमात सहभागी होतात. दररोज वादना-नंतर होणारं गीत असेल किंवा दरवर्षी होणारा वाद्य परिचय सर्व उपक्रमांतून सर्वांची उत्तम जडणघडण होण्यात मदत होते.

Comments