Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जडली कृष्ण सख्याची बाधा (गवळण ) रायगड भूषण | सुप्रसिद्ध गायक श्री. उदयकुमार नाकती 🎼🎵 в хорошем качестве

जडली कृष्ण सख्याची बाधा (गवळण ) रायगड भूषण | सुप्रसिद्ध गायक श्री. उदयकुमार नाकती 🎼🎵 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जडली कृष्ण सख्याची बाधा (गवळण ) रायगड भूषण | सुप्रसिद्ध गायक श्री. उदयकुमार नाकती 🎼🎵

ढोलकी, टाळ आणि पेटीच्या साथीने सादर होणारी भजनं, अभंग ही महाराष्ट्राची ओळख आहे. पारंपरिक लोकगीतं, भजनं आणि अभंग आजवर केवळ मौखिक स्वरुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये या त्यांचा मोठा वाटा आहे. गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे. गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. यातील विनोदाचा आणि मार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्या निमित्ताने आध्यात्मिक चर्चादेखील घडवून आणली जाते. गौळणीतील मावशी आणि पेंद्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गौळणी यांच्यातील संवाद अतिशय चटकदार आणि द्व्यअर्थी असतात. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गौळणी, मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजेच तमाशातील 'गौळण' मिळाल्यानंतर सर्व गौळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गौळण संपते. गवळण ही पारंपरिक पद्धतीने, राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते. गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते. विशेष आभार श्री. कालभैरवनाथ प्रसादिक भजन मंडळ मु.काळसुरी पो. मेंदडी ता. म्हसळा जि. रायगड सुप्रसिद्ध भजन सम्राट - बुवा रायगड भूषण श्री उदयकुमार नाक्ती = ही नटखट गौळण राधा = ही नटखट गौळण राधा l मी कृष्ण कन्हैया साधा ll जडली कृष्ण सख्याची बाधा..ll करते राधा ही प्रेम सुखाचा वादा llध्रुll नटून आली राधाबाई l कान्हाला घेऊन जाई ll वृंदावनात गौळणी रास खेळाया ll पाहून कान्हाची ही अदा, झाल्या गौळणी साऱ्या फिदा ll जडली कृष्ण सख्याची बाधा..ll करते राधा ही प्रेम सुखाचा वादा ll 1 ll लपवू नको दहीदूधलोणी l नको टाकू दुधात पाणी ll आले सवंगडी सारे दही खाण्याला...ll नको लागुस माझ्या नादा l माझ्या प्रेमात जीव तुझा आधा ll जडली कृष्ण सख्याची बाधा..ll करते राधा ही प्रेम सुखाचा वादा ll 2 ll श्री. कालभैरवनाथ प्रसादिक भजन मंडळी ( मणेरी -नानवली ) श्री. कालभैरवनाथ क्रिकेट क्लब (नानवली - मुंबई ) व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏श्रीवर्धन - मणेरी -नानवली #कोकणची_वारी •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT for more such amazing videos ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Comments