Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मातीतल्या कलाकाराने बांधले पर्यावरण अनुकूल घर|Tour of Sustainable Eco-friendly House в хорошем качестве

मातीतल्या कलाकाराने बांधले पर्यावरण अनुकूल घर|Tour of Sustainable Eco-friendly House 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मातीतल्या कलाकाराने बांधले पर्यावरण अनुकूल घर|Tour of Sustainable Eco-friendly House

तळ कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील परुळे ह्या गावातील अमित तेली ह्या तरुणाने मातीकाम करणाऱ्या जुन्या कारागिरांना घेऊन संपूर्ण नैसर्गिक घर बांधले आहे... त्याने घरातली लाईट आणि गिझर सुद्धा सोलार (सौर ऊर्जा) वर घेतला आहे... कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हे घर आकर्षित करते आहे... ह्या कलाकाराच्या घरचा मालवणी पाहुणचार घ्यायची संधी नुकतीच मलाही मिळाली...हा अनुभव व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्यासोबत share करीत.. ह्या घराची tour नक्की पहा मातीची कला आणि "वसुंधरा" इको फ्रेंडली हाऊस. सिंधुदुर्ग मधीलअमित तेली यांचे घर ..... एका लहान गावात एक छान टुमदार कौलारू घर असावे. घरासमोर अंगण असावे, बाग असावी. शेणाचे सारवण, लाकडी माळा आणि मातीचे लिंपण असलेल्या भिंती असाव्यात अशी प्रत्येक शहरी माणसाची इच्छा असते. आणि येणाऱ्या भावी पिढीला याचे दर्शन तरी होईल का? अशी सर्वांचीच खंत असते. शहरातील ए. सी च्या क्रृत्रिम थंडाव्यापेक्षा मातीच्या घरातला नैसर्गिक थंडावा अनुभवायचा असतो. रोजच्या धावपळीला वैतागलाय ? थोडा आराम हवाय? मग चला... ✈ एक /दोन दिवस वेळ काढा.. स्वतः साठी... आणि अनुभवा तुमच्या मनातल्या गावात, डोंगराच्या कुशीत मातीच्या प्रशस्त घरात राहण्याच स्वप्न... मालवण जवळील परुळे गावात अमित तेली यांनी आठशे चौरस फुटाचे चिखल मातीचे सुंदर असे एक घर बांधले आहे. घर जास्त मोठे नसावे पण निसर्गात विलीन होणारे असावे. उजेड पुरेपूर असावा. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा आणि स्थानिक नैसर्गिक साहित्याने ते बांधले जावे अशी त्यांची इच्छा होती. स्वतः चित्रकार- कलाकार असल्याने स्वप्नातल्या एका घराची संकल्पना त्यांनी कृतीतून प्रत्यक्षात आणली. दगडी पायावर मातीच्या जाडजुड भिंती. मातीच्या जमिनीला शेणाचे सारवण. मुलांनी कितीही उड्या मारल्या तरी चिंता नाही. मुळातच हे घर मातीच्या गुणधर्मांची योग्यता अधोरेखित करते. नैसर्गिक घराचा आपल्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम, अनावश्यक खर्च टाळून योग्य खर्चात होणारे बांधकाम आणि त्याचे आजूबाजूच्या वातावरणाला साधले जाणारे अनुकूलन ह्या घराच्या जमेच्या बाजू. हे घर आपल्या पारंपरिक बांधकामाच्या शैलीला आताच्या आधुनिक गरजांशी जोडते. सिंधुदुर्ग एअरपोर्ट पासून फक्त २ मिनिटं, '' ब्लू फ्लॅग'' नामांकित प्रसिद्ध भोगवे समुद्र किनारा १० मिनिटं, मालवण ३० मिनिटं, जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ फक्त ३० मिनिटं एवढ्या अंतरावर... एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण जिथे आपण आपले कुटुंब व मित्र परीवारासहीत सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. हे कोकणातील मॉडर्न मातीचे घर असून त्यात आपल्या सुविधेसाठी प्रायव्हेट स्विमिंग पूल 🏊‍♂, वाय - फाय सर्विस, टिव्ही, सोनी सराउंडींग साऊंड सिस्टीम, मिनी गॅस ची शेगडी, लायब्ररी, गावची सैर करायला सायकल 🚴‍♀ सुविधा असणार आहे. निवांत आराम आणि फिरण्यासारखे बरेच काही आपल्या माणसांसोबत.... 🎣 तसेच आहे आपुलकीचे कोकणी आदरातिथ्य. '' वसुंधरा '' हे एक मॉडर्न क्ले हाऊस असून सोलार पॅनलवर ह्या घराची विजेची संपूर्ण गरज पुर्ण केली जाते. त्यामुळे विज ही पुर्णत: नैसर्गिक. एका वेळी जास्तीत जास्त २ ते ८ जण येथे राहू शकतात. मातीची चुलीवरचे जेवण आहे. आपल्या आवडीनुसार अस्सल मालवणी शाकाहारी 🥙 मांसाहारी 🍗🍤 जेवणाची सोय येथे केलेली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतः ला मोकळा वेळ द्या. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी '' वसुंधरा इको फ्रेंडली हाऊस '' मध्ये नक्की या. येवा कोंकण आपलोच आसा... 🏕 बुकिंग साठी संपर्क... अमित तेली :9404748833 /7498682336

Comments