Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आजीलाच बनवले "ब्रँड ॲम्बेसेडर"|Konkani Aajji's Ecostore в хорошем качестве

आजीलाच बनवले "ब्रँड ॲम्बेसेडर"|Konkani Aajji's Ecostore 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आजीलाच बनवले "ब्रँड ॲम्बेसेडर"|Konkani Aajji's Ecostore

शाश्वत पर्यटनाची व्याख्या संयुक्त राष्ट्राने केली आहे. सिंधुदुर्गाची जैव विविधता, आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा बघता आपल्या जिल्ह्याचे स्वतःचे असे शाश्वत मॉडेल विकसित झाले पाहिजे. भूतान आणि उत्तर पूर्व राज्यातील पर्यटन हे एक उच्च दर्जा असलेले पर्यटन आहे. असे उच्च दर्जाचे पर्यटन मॉडेल जर सिंधुदुर्ग मध्ये करायचे असेल तर त्यासाठी स्थानिकांनी आपआपल्या गावाच्या जैवविविधतेचा, संस्कृती आणि परंपरेचा शास्त्रोक्त अभ्यास केला पाहिजे. पर्यटन हा शेती, बागायती, फूड प्रोसेसिंग, कला कौशल्य इत्यादी व्यवसायाला जोड देऊन शास्वत-पर्यटन विकसीत झाले पाहिजे. मौज मस्ती चे पर्यटन यामुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला सर्वत्र दिसत आहेतच. शाश्वत-पर्यटना मुळे स्थानिक जैवविविधता, संस्कृती आणि परंपरा जोपासल्या जातील आणि अश्या विषयांचे अभ्यासक, देश-विदेशातले पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्या मध्ये अनुभव, शिक्षण आणि आरोग्य पर्यटन अनुभवण्यासाठी सिंधुदुर्ग मध्ये येतील. हे सर्व करायला पैश्या पेक्षा सर्जनशील मानसिकता विकसित करणे ही काळाची गरज आहे. पाणथळ जागेच्या सर्वेक्षणामुळे अलीकडेच धामापूर तलावाला जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळण्यासाठी मदत झाली. हीच उद्दिष्ट्ये ठेऊन काळसे धामापूर या जैव विविधतेने नटलेल्या गावात काही तरुणांनी शाश्वत उद्योगाची सुरुवात केली आहे. या पैकी एक तरुण रोहित आजगावकर या LIC एजंट ने आपल्या शाश्वत उद्योगाचे ब्रँड अॅम्बेसेडर आपल्या आजीलाच केले आहे. "आजगावकर आजी किचन एंड इको स्टोर" ची सुरुवात त्याने काळसे येथील आपल्या राहत्या घरीच केली आहे. रोहित हा मुळात मेकॅनिकल इंजिनियर. शिवाजी विद्यामंदिर, काळसे येथे शालेय शिक्षण घेऊन त्याने भारतीय विद्यापीठ, मुळशी इथून इंजिनीरिंग चे शिक्षण पूर्ण केले. इंजिनीरिंगचे शिक्षण घेताना महानगर मधली जीवनशैली,आणि मुळशी पॅटर्न सारख्या विकासाच्या पॅटर्न मधून उद्भवणाऱ्या समस्या त्यांनी अगदी जवळून बघितल्या. इंजिनीरिंगची डिग्री घेऊन सुद्धा त्याने कॅम्पस प्लेसमेंट मध्ये भाग घेतला नाही आणि सरळ आपले निसर्गसंपन्न काळसे-धामापूर गाव गाठले. गेले अनेक वर्ष तो एलआयसी एजेंट म्हणून कार्यरत आहे. अनेक वर्ष रोहित शाश्वत विकास यावर वाचन करत आहे. गांधीजींची ग्रामउद्योग संकल्पना असो किंवा भूतान चा हॅपिनेस इंडेक्स, या सर्वातून प्रेरणा घेत रोहितने आपल्या राहत्या घरीच इको स्टोर सुरू केले आहे. "इको स्टोरची प्रेरणा मला माझ्या आजीपासून मिळाली. इको स्टोरच्या माध्यमातून माझ्या आजीच्या हाताची चव आणि पारंपरिक पाककला एक दिवस देश-विदेशात जाईल असे माझे स्वप्न आहे" असे रोहित म्हणतो. या इको स्टोर मध्ये आजीच्या पाक कलेची उत्पादने विक्री साठी उपलब्ध आहेत. गेले २० वर्ष आजगावकर आजी यांची पिठी खूप प्रसिद्ध आहे. रोहित ने पिठीच्या रेसिपी मध्ये थोडेसे बदल करून कुळीथ सूप बनवले आहे. बाजारात मिळणाऱ्या सूप मध्ये प्रिजर्वेटिव्ह आणि थिकनिंग एजंट टाकले असतात परत्नू कुळीथ मध्ये हे टाकण्याची गरज नाही. खरं तर आपली पिठी जगातले उच्च दर्जाचे सुपच आहे परंतु आपण कोकणी माणसे सदारणीकारणा मध्ये कमी पडतो असे रोहित म्हणतो. इको स्टोर करताना रोहित ने माती पासून वॉल पेंट बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे माती पासून स्वतः रंग बनवून इको स्टोरच्या भितींना दिला आहे. काळसे गावातील श्री प्रशांत मिस्त्री या स्थानिक सुतार यांच्या मदतीने रोहित ने स्टोर मध्ये टाकाऊ लाकडांपासून शेल्फ बनवले आहेत. यामुळे इको स्टोरला नैसर्गिक सौंदर्य आले आहे - Raw nature in all its beauty कुळीथ पासून साजूक तुपात बनवलेले पौष्टिक लाडू सुध्दा इको स्टोर मध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत. अमेरिकेच्या नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कुळीथ ला भविष्यासाठी एक आशादायक अन्न स्रोत म्हणून ओळखले आहेत. आजकालच्या वैदकीय जगात कुळीथला एक विशेष दर्जा आहे. कुळतातले अफाट पौष्टिक मूल्ये आणि फिटनेस फायदे बघता रोहित आपल्या आजी बरोबर कुळीथ वर आजुन विविध उत्पादने बनवण्याचे प्रयोग करत आहे. या वैतिरिक्त पर्यावरण पूरक उत्पादने रोहित ने आपल्या इको स्टोर मध्ये विक्री साठी ठेवली आहेत. लवकरच आजगावकर आजी किचन हे छोटे रेस्टोरंट आणि होम स्टे सुद्धा रोहित सुरु करणार आहे. वडा पाव आणि पाव भाजीच्या खाद्य संस्कृतीत कोकणात अनेक पारंपरिक रेसिपीज हरवत चालल्या आहेत. या पारंपरिक रेसिपीज आणि दुर्लक्षित फळ आणि फुले यांच्या पासून बनवलेली व्यंजने या रेस्टोरंट च्या माध्यमातून शास्वत पर्यटनाचे उद्दिष्टय साकार करायची आहेत. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून गावात शाश्वत आणि पर्यावरणपूरक व्यवसायांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल अशी आशा रोहित ने व्यक्ती केली आहे. कुडाळ-मालवण रोड वर काळसे आणि धामापूर गावाच्या हद्दी वर असलेल्या या इको स्टोरला भेट देताना चहा-कोफी ऐवजी गरम कशायचा आस्वाद घ्यायला विसरू नका. रोहित आजगावकर : ७०८३५ ४२२५२ 75889 02953 अवश्य भेट द्या : स्थळ /Google location https://goo.gl/maps/MC1s8dc15x6X1hURA Videography By : Yash Jage (Konkani Ranmanus Team)

Comments