Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб चिचाटी धबधबा | मेळघाट | Trekking to Chichati Waterfall | Melghat | मेळघाटातील अपरिचित धबधबा в хорошем качестве

चिचाटी धबधबा | मेळघाट | Trekking to Chichati Waterfall | Melghat | मेळघाटातील अपरिचित धबधबा 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



चिचाटी धबधबा | मेळघाट | Trekking to Chichati Waterfall | Melghat | मेळघाटातील अपरिचित धबधबा

मेळघाटी धबधबे चीचाटीचं खोरं किंवा वाघदरा - डॉ. जयंत वडतकर 9822875773 परतवाडा येथून चिखलदरा येथे जाणाऱ्या रस्त्यावर १० किमी अंतरावर धामणगाव गढी हे गाव लागते. येथील वनविभागाचे चेकपोस्ट ओलांडले कि पुढे घाट सुरु होतो. या घाटाच्या पूर्वीच एक रस्ता डावीकडे जातो तो देवगाव कडे. धामणगाव गढी वरून देवगाव ०५ कि.मी. अंतरावर आहे. भीमकुंड धबधब्याच्या पायथ्याशी जाण्याचा मार्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजुने वसलेल्या बागलिंगा या गावापासून सुरु होतो. बागलिंगा गावात देवगाव वरूनच जावे लागते, याच रस्तावर अवघ्या ४ किमी अंतरावर, बागलिंगा गावाच्या पूर्वीच डावीकडे चीचाटी फाटा लागतो. फाट्यावरून २ कि.मी. अंतरावर चीचाटी गाव लागते. गावापर्यंत डांबरी सडक आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी गावची शाळा, अंगणवाडी, लागते अन थोडं पुढे गेलो कि गाव दोन रस्त्याने विभागते. आता गावात पन सिमेंट चे रस्ते झाले आहेत रस्त्याला लागून टुमदार झोपड्यांची वस्ती, फाट्यापर्यंत ठराविक फेऱ्यामध्ये खासगी वाहन व एस. टी. बस ची व्यवस्था आहे, स्वतःची गाडी घेऊन आल्यास गाडी शाळेच्या आवारात ठेऊन व गावातून एखादा माहितगार वाटाड्या घेऊन पद्भ्रमानास सुरवात करावी. गाव ओलांडले कि कच्चा रस्ता लागतो व लगेच नदी लागते. कधी नदीच्या काठाने सिताफळाच्या जंगलातून, कधी नदी ओलांडून तर कधी थेट नदीतून असा हा २ ते २.५ किमी चा रस्ता. फारसे चढ उतार नाहीत, नदीचे पाणी फार वाढत नाही, जाऊन येऊन फारतर ४-५ किमी अंतराचा हा ट्रेक असल्यामुळे कौटुंबिक पदभ्रमण करिता उत्तम असे हे ठिकाण आहे. स्थानिक लोक या खोऱ्याला वाघदरा असे म्हणतात.

Comments