Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sarola Aurangabad Forest Trek Picnic Maharashtra | सारोळा जंगल भ्रमंती डब्बा पार्टी в хорошем качестве

Sarola Aurangabad Forest Trek Picnic Maharashtra | सारोळा जंगल भ्रमंती डब्बा पार्टी 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sarola Aurangabad Forest Trek Picnic Maharashtra | सारोळा जंगल भ्रमंती डब्बा पार्टी

Sarola - सारोळा #Sarola #सारोळा #Sarola-Forest #Aurangabad #Aurangabad-Explorers #Aurangabad-tourism #Priya-Jagtap-Salunke #Places-to-visit-in-Aurangabad #सारोळा : सारोळा सारांश : सारोळा हा नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर सिडको,औरंगाबाद पासून १५ किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सारोळा पर्यटकांनी भरलेला दिसतो. या जंगलाचे सौंदर्यच तसे आहे. येथील जैवविविधतेने समृद्ध जंगला‍त अनेक पक्षी आणि प्राणी सुरक्षित वातावरणात शांतपणे वाढतात. त्यांचे निरिक्षण करता येणे शक्य आहे. नवीन व अधिक माहिती साठी आणि औरंगाबादेतील नवनवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा आणि आमच्या youtube चॅनेल ला सबस्क्राईब करा . सावंगी टोल नाका सोडल्यानंतर पुढे लोकुत्तरा महाविहार आहे, हा औरंगाबादेतील सर्वात मोठा बुद्ध विहार आहे. त्यानंतर पुढे हिरवळीने नटलेल्या डोंगर रांगांमध्ये हनुमान मंदिरही आहे. ह्याच मार्गाने पुढे गेल्या नंतर उजव्या बाजूला सारोळ्याचा बोर्ड लागलेला दिसेल. पार्किंग साठी प्रशस्थ जागा आणि लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया सुद्धा आहे, इथे तुम्ही गरम गरम कोळश्यावर भाजलेल्या मक्याच्या कणसाचा आनंद घेऊ शकता तसेच इथे काही स्थानिक हॉटेल्स आहेत जिथे तुमहाला डाळ-बट्टी, झुणका- भाकर, पिठलं- भाकर अश्या गावरान जेवणाचा आनंद लुटता येईल. डब्बा पार्टी करण्यासाठी हे औरंगाबाद मधील सर्वोत्तम ठिकाण आहे असे म्हंटले तरी काही कमी नाही. आपल्या परिवारातील लहान मोठ्या सर्व व्यक्तींबरोबर पिकनिक करण्यासाठी इथे नक्कीच जाता येईल. इथे वर पर्यंत गाडी नेण्याची व्यवस्था आहे त्यामुळे वयस्कर लोकही निसर्गाचं सौन्दर्य अनुभवू शकतील. साधारण १५ मि. जंगलात चालल्यानंतर आपण निसर्गाच्या अगदी कुशीत येऊन बसू शकतो. इथे एक सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे. तसेच डब्बा पार्टी करण्यासाठी, खेळण्यासाठी आणि गप्पा गोष्टी करण्यासाठी सुंदर अशी बसण्याची व्यवस्था आहे. तिथून अजून थोडं वरती म्हणजे साधारण १० मि. चालल्यानंतर अजून एक महाराजांचे मंदिर आहे. ह्या मंदिराशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत तसेच स्थानिक लोक ह्या स्थळाला तीर्थ क्षेत्र म्हणून पूजतात. ह्याच स्थळापासून थोड्याच अंतरावर एम एस व्हॅली आहे, इथे चारी बाजूने डोंगराच्या मधोमत खूप सुंदर असा तलाव आहे. इथल्या निसर्ग सौन्दर्य म्हणजे क्या बात ..! चारी बाजूने येणारा मोराचा आवाज आणि पिसारा फुलवणारे ते मोर पक्षी. शहरापासून इतक्या जवळ अजून काय पाहिजे यार..! इथे जाण्यासाठीचे मॅप लोंकेशन मी ह्या मध्ये शेवटी देते. वर्णन : सावंगी टोल नाका सोडल्यानंतर समोर दूरवर पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची हिरवीगार शेते पिकांनी डोलू लागली होती. औरंगाबादच्या पर्वतराजीने क्षितीजापर्यंत हिरवी शाल पांघरली होती. त्यावर पांढर्‍याशुभ्र पुजक्यांचे ढग लडिवाळपणे खेळताना दिसत होते. नभात कृष्ण मेघांची दाटी झाली होती. रानवार्‍याने त्यांच्याशी हातमिळवणी केली आणि श्रावनधारा बरसू लागल्या. वृक्ष-लता चिंब भिजू लागल्या. त्यांच्या पानापानावरुन पाणी जमिनीवर पडू लागले. सारोळ्याच्या डोंगरवनातील पाऊस काळ्या शिळांवरुन कोसळू लागला होता. कुठेकुठे त्यावर धुकंही पांघरल्या जात होतं. क्षणातच वार्‍याच्या झुळकीमुळं धुक्यात ढोंगाराचे टोक झाकले जायचे आणि क्षणातच पडदा बाजूला व्हायचा तसंच निसर्गाचं खळाळतं हास्य नजरेत पडायचं. निसर्गाचं हे सौंदर्य अनुभवने म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूतीच मिळाल्यासारखे वाटत होते आणि पाहणार्‍याच्या मनाला नवीन उभारी मिळते. आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्याला अशा निसर्गरुपामुळे उर्जा मिळत असते. वर्षाऋतू हा सृजनपर्व सुरु करणारा ऋतू आहे. आकाश आणि धरतीच्या मीलनात ढग हे प्रेमदूत बनून येतात. मेघाचा अर्थ वर्षाव करणे असा होतो. जलधर, पयोधर आणि वारीवाह ही ढगांची तीन रुप आहेत. कालिदासाने वर्षाऋतूचं वर्णन ‘जलदसमय’ असे केले आहे. सारोळ्याचे पावसाळी वनवैभव अनुभवता अनुभवता चातक पक्षाचे पिऊ,पिऊ, पिप्पी पिऊ हे शब्द अख्या रानावर पसरत होते. सांज प्रहरी सारोळ्याचा हृदयस्थान असलेल्या एम एस व्हॅली ला पोहचलो. येथील संपूर्ण वनसृष्टीवर संधीछाया पसरली होती. गर्द हिरव्या वनराईत तलावातून एक गूढरम्य आवाज येऊ लागला. तो होता पाण्याच्या खळाळण्याचा. वनश्रीवरील हे दृश्य मनमोहित करीत होते. सारोळ्याच्या जंगलात पावसाळी भटकंती झाली. सारी निसर्गसृष्टी कशी हिरव्या रंगात न्हालेली दिसत होती. चिंब भिजलेली होती. तलाव भरलेले दिसत होते. पक्षी जिवन संपन्न दिसत आहे. एकंदरीत सारी सजीवसृष्टी आल्हाददायी दिसत होती. सृष्टीचक्रात निसर्ग आपली विविध रुपं तिनही ऋतूत दाखवित असतो. मात्र पावसाळी वनवैभव अनुभवने म्हणजे नवचैतन्य मिळविणे असेच असते. गूगल मॅप लोकेशन : https://www.google.com/…/data=!3m1!4b... - प्रिया जगताप - साळुंके sarola-forest-aurangabad-maharashtra-trek-video-aurangabad-explorers sarola ,sarola-forest ,aurangabad-trek; aurangabad; maharashtra; places to visit in aurangabad; aurangabad exploreres; priya jagtap; priya salunke; priya; forest trek; places to visit in maharashtra; aurangabadtourism.com; sarola aurangabad; treking place; "Explore the hidden places in Aurangabad, Maharashtra" Helping travelers and locals explore Aurangabad, Maharashtra,India. Find the best places to eat & go out, things to see & do, events, shopping & much more. #Aurangabad #Travel #Guide #AurangabadExplorers I am 24 year old Android Developer in Aurangabad. I love to travel and explore. Through this vlog I will show you the amazing places in Aurangabad where we can go,eat,travel and have fun along with friends and family. Stay tuned for new videos. Facebook :   / aurangabad-explorers-105125667512736  

Comments