Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Eco friendly Easy Ganpati Decoration 2024 в хорошем качестве

Eco friendly Easy Ganpati Decoration 2024 10 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Eco friendly Easy Ganpati Decoration 2024

सर्वाध्यक्ष,सर्वगुण संपन्न,बुध्दिविधाता,प्रथमपुज्य,प्रथमेश तु,महर्षि वेद व्यास रचित महाभारताचा लेखनिक विद्याधर तु ! “श्री गणेश लिखीत महाभारत देखावा” भारतीय गणेशोत्सवाचा आणि आम्ही यंदा साकरलेल्या बाप्पाच्या देखाव्याचा पौराणिक इतिहास ! महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात भाद्रपद शुध्द चतुर्थीला थाटामाटात साजरा होणाऱ्या बाप्पाच्या या मोहोत्सवाचा इतिहास काय आहे ? १८९३ साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालु केला परंतु परंपरेनुसार त्या आधीही १० ते ११ दिवस बाप्पांचे स्थापना करुन पुजा अर्चना केली जात असे.हा उत्सव नेमकी का साजरा केला जातो हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल माहित तर संपुर्ण माहिती वाचा. पुराणांमध्ये नमुद केल्यानुसार महर्षी वेदव्यासना महाभारताचे लिखाण करावयाचे होते पण एक अडचण होती त्यांना काव्य स्फुरण फार वेगाने होते असे त्यांच्य्या मुखातुन एक सलग वृत बध्द श्लोक एका पाठोपाठ बाहेर पडत असत आणि पुढील श्लोक स्फुरत असता मागील संर्दभ देणे शक्य होत नसे.तसे करावे लागल्यास त्यांच्या स्फूतिस ते बाधक करत असे,त्यामुळे त्यांना अश्या टंकलेखकाची आवश्यकता होती जो त्यांच्या स्फुर्तीच्या वेगास अनुसरुन सगळे श्लोक मुर्दित करु शकेल आणि न थांबतां सलग मुद्रण करेल.अशा लेखनिकाच्या शोधार्थ वेद व्यासमुनी ब्रम्हदेवाकडे गेले तेव्हा ब्रम्हदेवांनी वेद व्यासमुनीनां सागितले की असा लेखनीक केवळ एकच आहे. तो म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वज्ञानी सर्व देवतांमध्ये बुद्धिमान असलेले “ श्री गणेश ”वेद व्यासांनी गणेशा कडे त्यांच्या महाग्रंथ लेखनाचा प्रस्ताव मांडला.गणेश म्हणाले“ठीक आहे.मात्र माझी एक अट आहे महाभारत सांगत असतांना तुम्ही मध्ये कुठलेही मध्यांतर न घेता सांगत जायेचे.तुम्ही थांबलात की मी निघुन जाईन.आता वेद व्यासांची प्रतिभा ती आपण काय वर्णावी ! पण एवढ्या सार्वार्थांने मोठ्या ग्रंथाची रचना करायची,तर मध्ये मध्ये विचार करायला वेळ तर हवीत आणि म्हणूनच वेद व्यासांनीही श्री गणेशांची अट मान्य करुन युक्तीने श्री गणेश यांना देखील एक अट घातली की मी जोवर आणि ज्या वेगाने सांगत जाईल तुम्हीही त्याच वेगाने आणि मला मध्ये मध्ये न अडवता केवळ एकदाच ऐकुन अर्थ समजून घेऊनच सलग अचूक मुद्रण करावे लागेल. ही अट श्री गणेशाने मान्य केली ठरल्याप्रमाणे“भाद्रपद शुध्द चतुर्थी च्या मुहूर्तांवर श्री गणेश वेद व्यास यांच्या आश्रमात आले.आश्रमात वेद व्यासानी श्री गणेशाचे अगदी वाजत गाजत स्वागत करण्यात आले. श्री गणेश म्हणजे बुध्दीच देवता म्हणून वेद व्यासांनी त्यांना खास सजवलेल्या आसनावर बसवले, त्यांचे यथा विधी पूजन केले.महाभारतासारखे मोठे महाकाव्य रचून लिहायला नाही म्हणाले तरी बरेच दिवस लागणार होते आणि गणेशाच्या अटी प्रमाणे हे लिखान सलग करायचे होते.येवढा काळ एकाच ठिकाणी स्थानपन्न राहावयाचे याचा श्री गणेशास त्रास होऊ नये म्हणून व्यासांनी गोमय,चंदन,वाचा,कर्पूर आणि इतर औषधी युक्त माती श्री गणेशाच्या सर्वांगासन लावली.लिखाणा साठी एकाग्रता यावी म्हणून श्री गणेशयांच्या शिर्शवर दूर्वा ठेवले आणि भाद्रपद शुध्द चतुर्थीच्य् दिवशी योग्य मुहूर्त साधून महाकाव्याच्या मुद्राकनास सुरुवात केली त्या क्षणा पासुन पुढे अकरा दिवस पर्यंत वेद व्यास एक सलग श्लोक सांगत गेले आणि तत्पर श्री गणेश ते मुर्दित करत गेले.लेखन चालु असतानाच श्री गणेशाची लेखनी वांरवांर मोडत असे तेव्हा स्वंय भगवान परशुराम पृथ्वीवर अवतरले आणि श्री गणेश आणि परशुराम यांच्या युध्दात परशुरामने आपल्या परशु ने जो गणेशाचा एक दंत तोडले होते त्याचाच लेखनी म्हणून वापर करण्यास बाप्पांना दिले,आणि पुढील लेखन सुरु करण्यास सुरवात केले.म्हणूनच बाप्पाला एक दंत असे ही म्हटले जाते.वेद व्यास आणि श्री गणेश या दोघांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती..वेद व्यासांना स्फुरावे आणि त्यांच्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात न पडतात तोवर गणेशाने ते तितक्याच वेगाने लिहावेत.या अकरा दिवसांच्या कालावधी वेद व्यासयांच्या पत्नी वाटीका देवी आणि इतर ऋषींचे पत्नींनी सेवकाचे पाक कौशल्य वापरुन विविध सुग्रास पक्वाने करुन गणेशास आपल्या हाताने खाऊ घातले.त्यांच्या कार्यमग्नतेस कुणाची नजर लागु नये म्हणून सकाळ-सांयकाळ दोन्ही वेळेस त्यांची कर्पूर आरती ने दृष्ट काढली जात असे.अकराविषयी दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द चतुर्दशीस वेद व्यासांचे महाकाव्य पूर्ण झाले गणेशाने एक गाती त्याचे मुद्रण पूर्ण केले.एका फार मोठ्या महायज्ञाची जणू सांगतां झाली होती.पण अनेक दिवस आणि अनेक रात्र सलग मुद्रण कार्य करत एकाच आसनावर बसून राहिल्या मुळे श्री गणेशाच्या शरीराचा उष्मांक वाढला होता,औषधी मृतिका आणि ताज्या दूर्वा सारख्या शीतोापचार करुनही श्री गणेशाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला होता.मग वेद व्यास मुनींनी जवळपास वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या गार पाण्यात बुडवून व नदीच्या गार पाण्याच्या स्पर्शाने गणेशाचा दाह कमी झाला आणि श्री गणेश सर्वांचा निरोप घेऊन आपल्या स्वर्गगृही परतले. हा वेद व्यासांचा महाभारत मुद्रणाचा काळावधी आपण गणेशोत्सव म्हणून साजरा करत असतो.श्री गणेशाच्या मातीच्या मूर्ती स्थापण करुन सकाळ सायंकाळ हार दूर्वा वाहून पुजा आरती करत असतो.गोडाचा मैवैद्य करतो.आणि भाद्रपद शुध्द चतुर्दशीला (अनंत चतुर्दशीला) बाप्पाच्या मुर्तीचं विसर्जन करुन त्याला निरोप देतो. वेद व्यासांच्या अफार प्रतिभेचे आणि गणेशाच्या कार्यकुशुलते चे प्रतीक म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही श्री गणेश लिखीत महाभारत हा देखावा साकारला आहे.गणेशोत्सवाचे महत्व आणि पौराणिक इतिहास समाजापर्यंत पोहचवण्याचा एक छोठा प्रयत्न म्हात्रे परिवाराकडून करण्यात आला आहे पौराणिक संदर्भः- गो.नी.दांडेकरांचे 'गणेशायन' या कांदबरी मधुन घेतले आहे. आमचा ह्या सजावटीच्या मागचा मुख्य हेतू निसर्गातील पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून निसर्गाचा तसेच मानवी जीवनाचा समतोल साधने व आपल्या पौराणिक इतिहास आताच्या पिढीला सांगणे हेच आहे.

Comments