Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सोडिला संसार । माया तयावरि फार ।।१।। श्री हरी किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ в хорошем качестве

सोडिला संसार । माया तयावरि फार ।।१।। श्री हरी किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ 6 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सोडिला संसार । माया तयावरि फार ।।१।। श्री हरी किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ

🚩🚩🙏श्रीकृष्णकृपामुर्ती श्रीमद्भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ.🙏 Shrikrishnakripankit Dr.Vikasanand Maharaj Misal 🙏 🚩 जय सद्गुरु माऊली 🚩🙏 🍁 रंग कीर्तनाचा 🍁 🍃 अभंग क्रं. ३५ 🍃 #सोडिला_संसार । #माया_तयावरि_फार ।।१।। धांवे चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ।।२।। यानें घ्यावें नाम । तीसी करणें त्याचें काम ।।३।। तुका म्हणे भोळी । विठ्ठल कृपेची कोंवळी ।।४।। ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रस्तुत सेवेकरीता आलेला अभंग सदेहवैकुठवासी वैराग्याचे मुर्तीमंत पुतळे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील असुन संतांचे अथवा भक्तांचे वर्णन करणारा असा चार चरणाचा अतिशय सुंदर अभंग आहे. खरे पाहीले असता आमच्या अडाणी मते भगवंताचे प्रेम हे सर्वांवरच असते परंतु भक्तांवर विशेष प्रेम असते कारण भक्तांनी एका भगवंतासाठी संसाराचा संपूर्णपणे त्याग केलेला असतो किंवा त्यांच्या करीताच संसार सोडलेला असतो म्हणून भगवंतांचे त्यांच्यावर विशेष प्रेम असते असे या पामर मनाला वाटते. याबाबतच वर्णन करताना म्हणतात की ज्यांनी संसार सोडला आहे त्यांच्यावर भगवंताची अपार माया म्हणजे प्रेम असते. हेच अभंगाच्या प्रथम चरणात श्री संत तुकोबाराय सांगत आहेत. सोडीला संसार | माया तयावरी फार || १ || प्रथमतः संसार म्हणजे आमच्या अडाणी मते मी देह समजणे अथवा मानने म्हणजेच संसार होय . हाच संसार ज्यांनी सोडिला म्हणजे ज्यांनी देहावरची आसक्ती काढुन किंवा ज्यांची देहावरची आसक्ती निघुन ज्यांचे मन देवावर आसक्त झाले आहे. जे आपल्या देहावर नित्यपणे उदास असुन ज्यांच्या मनाचा विषय एक भगवंतच झालेला आहे. ज्यांचे संसारावरील अथवा देहावरील प्रेम निघुन देवावर प्रेम जडले आहे. अशा प्रकारे ज्या भक्तांनी संसार सोडला आहे त्यांच्यावर भगवंताची माया फार आहे म्हणजे भगवंताचे प्रेम त्यांच्यावर अपरंपार आहे. असे श्री संत तुकोबाराय सांगत आहेत. अशा भक्तांच्याच मागे मागे देव धावत चालत असुन त्यांच्यावरील सुखदुःखाचे आघात स्वतः सहन करतो. असे अभंगाच्या द्वितीय चरणात श्री संत तुकोबाराय सांगत आहेत. धावे चाले मागे मागे | सुख दुःख साहे अंगे || २ || भगवंत साक्षात आपल्या भक्तांच्या धावत चालत असुन त्यांचा सांभाळ करतो एवढेच नाही तर त्यांच्यावर येणारे सुखदुःख आपल्या अंगाने स्वतः सहन करतो याबाबतचे अंबऋषी सारखे अनेकांचे उदाहरण आपण सर्व जन सर्वश्रृत असल्यामुळे आपल्याला माहीतच आहे . म्हणुन ज्यांनी संसाराचा त्याग केला आहे किंवा संसार सोडला आहे त्यांच्यावर भगवंताची माया फार असुन त्यांच्याच मागे मागे देव चालत असुन त्यांच्यावर कोसळणारे सुखदुःखाचे डोंगर स्वतः आपल्या अंगाने सहन करतो असे श्री संत तुकोबाराय सांगत आहेत . फक्त त्या भक्ताने देवाचे नाव घ्यावे व देवाने त्यांचे काम करावे. असे श्री संत तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. याने घ्यावे नाम | तीसी करणे त्याचे काम || ३ || भक्तांनी भगवंताचे नाम घ्यावे किंवा भगवंताला आतुरतेने हाक मारावी व भगवंताने धावत जाऊन त्यांचे काम करावे म्हणजे त्यांना अडचणीतुन सोडवावे. जसे की वस्त्रहरणाच्या वेळेस द्रोपदी मातेने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला असता किंवा भगवंताला प्रेमाने, आतुरतेने हाक मारली तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण हजर होऊन द्रोपदी मातेला वस्त्रे पुरवुन द्रौपदी मातेचे रक्षण केले हो. किंवा नाथबाबा सतत भगवंताचे नामस्मरण करत होते म्हणून पांडुरंग परमात्माने त्यांच्या घरी राहुन पाणी वाहणे वगैरे सर्वच कामे केलीत. म्हणुन याने म्हणजे भक्ताने फक्त भगवंताचे नाम घ्यावे व भगवंताने त्यांचे सर्व काम करावी किंवा भगवंत त्यांची सर्व कामे करीतो. असे श्री संत तुकोबाराय सांगत आहेत. शेवटी महाराज म्हणतात की असे जे भगवंताची भोळी सेवा करणारे आहेत त्यांच्यावर विठ्ठलाची कृपा सहजच होते किंवा दुसरा अर्थ असा की विठु माऊली ही भोळी असुन कृपेची कोवळी आहे .असे श्री संत तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे भोळी | विठ्ठल कृपेची कोवळी || ४ || पांडुरंग परमात्मा विठ्ठल किंवा विठु माऊली ही आपल्या भक्तांच्या भावाला भुलणारी अशी भोळी असुन आपल्या भक्तांना कृपेचे आनंदरुपी कोवळ्या उन्हाचा प्रकाश देणारी अशी कृपेची कोवळी आहे. म्हणजे कुणीही भगवंताचे प्रेमपुर्वक नामस्मरण केले असता त्यांच्यावर भगवंत कृपा करुन परमानंद प्राप्त करुन देतो. आणि आपल्या अज्ञानी जीवाला सुद्धा भगवंताची कृपा प्राप्त करुन परमानंद प्राप्त करायचा असेल तर भगवंताचे प्रेमपुर्वक अखंड नामस्मरण करावे असा गुप्त उपदेश सुद्धा श्री संत तुकोबाराय आपल्याला अथवा या जगाला करीत आहेत. असे या पामर मनाला वाटते. असो आलेल्या अभंगावर धावत धावत अल्पसे तुटुक मुटुक चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. नेहमीसारखी कमतरता आहेच परंतु आपण सर्व जन ज्ञानी आहात म्हणून आपल्या पदरची ज्ञानसाखर टाकुन घडलेली कडुमडु सेवा गोड करुन घ्या 👏 करविली तैसी केली कटकट | वाकडी का नीट देव जाणे || 🙏 शुभ चिंतनमय क्षण 🙏 🙏 जय हरि माऊली 🙏 🙏 राम कृष्ण हरि 🙏 🙏🏽 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

Comments