Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खमंग थालीपीठाची भाजणी | How To Make Thalipeeth Bhajani | Thalipith Bhajani I Marathi Recipes в хорошем качестве

खमंग थालीपीठाची भाजणी | How To Make Thalipeeth Bhajani | Thalipith Bhajani I Marathi Recipes 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



खमंग थालीपीठाची भाजणी | How To Make Thalipeeth Bhajani | Thalipith Bhajani I Marathi Recipes

खमंग थालीपीठाची भाजणी | How To Make Thalipeeth Bhajani | Thalipith Bhajani I Marathi Recipes तुम्ही जर मराठी आणि महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला थालीपीठ हा पदार्थ नक्कीच माहीत असणार. मराठी घरांमध्ये लहानपणापासून नाश्त्यासाठी तसंच जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं केली जातात. थालीपीठ दिसायला जरी ओबड-धोबड असलं तरी त्याची चव इतकी अप्रतिम असते, कित्येक तास त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते, म्हणूनच थालीपीठ मराठी लोकांबरोबरच अमराठी लोकांनाही आवडतं आणि थालिपीठाची ही भाजणी जर तयार असेल तर खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ पटापट करता येतात. थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारे करता येतात ,पण थालीपीठ च्या प्रकारात भाजणीचे थालीपीठ हे सगळ्यात मुख्यस्थानी आहे. ही भाजणी बनवणं अतिशय सोपं आहे. मला असं वाटतं की भाजणी चे थालिपीठ हा अगदी जुना प्रकार असावा, जेव्हा माणसाला धान्य व भाजता आणि दळता येऊ लागली त्यावेळेस पासून हे थालीपीठ बनवलं जात असावं कारण ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे याच्यामध्ये अजिबात काही किचकट पणा नाहीये, भाजणीचे पीठ करणं हे जरी निगुतीची गोष्ट असली तरी धान्य , कडधान्य, धने-जिरे योग्य प्रमाणात एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे, आणि हे गिरणीतून दळून आणलं की आपण अर्धी लढाई जिंकतो. आणि या जादुई पिठामध्ये अक्षरशा तुम्ही कुठलीही भाजी घाला ती प्रेमाने एकजीव होते आणि सुंदर चवीच् खमंग खुसखुशीत चुरचुरीत थालीपीठ तयार होतं आणि थालीपीठ हे अतिशय पौष्टिक आहे हल्लीच्या डायट च्या काळामध्ये ज्वारी, बाजरी असे मिलेट्स खूप डिमांडमध्ये आहेत म्हणूनच थालिपीठाची भाजणी मल्टीग्रेन प्रकारांमध्ये मोडते. मल्टीग्रेन पिठं बाहेरून आणून त्याचा हेल्दी पदार्थ बनवायची सवय लावण्यापेक्षा वर्षभराची भाजणी एकदाच बनवून ठेवली की काही चिंताच नाही वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठ तुम्ही घरच्या घरी करू शकता. मी लग्न करून सासरी आल्यावर माझ्या सासूबाईंनी मला जे थालीपीठाची भाजणी ची रेसिपी शिकवली आहे ती मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्या सासूबाईंनी सांगितला आहे कि थालीपीठमध्ये काही गोष्टी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातल्या तरीही चालतं तर माझ्या सासुबाईंचे प्रमाण आहे. written recipe - http://www.servedelish.com/thalipeeth... साहित्य तांदूळ एक किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी अर्धा किलो हरभरा डाळ अर्धा किलो उडीद डाळ पाव किलो मुग डाळ पाव किलो गहू एक कप धणे एक कप जिरे एक कप कृती: १) सर्व साहित्य वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. भाजताना मध्यम आचेवर भाजावे. २) भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडे सरसरीत दळून आणावे. टीप: १) सर्व साहित्य खमंग भाजले गेले पाहिजे, जर कमी भाजले गेले तर चव चांगली लागत नाही. २) भाजणी शक्यतो प्लास्टिक पिशवीत भरून डब्यात ठेवावे. इतर पिठांसोबत एकाच डब्यात ठेवू नये. भाजणीचा वास इतर पिठांना लागतो. #Thalipithbhajani #marathipadartha #multigrainattarecipe ServeDelish,Homemade,Healthy,Easy,Delicious recipes,healthy recipes,healthy recipes for kids,homemade,खमंग थालीपीठाची भाजणी,How To Make Thalipeeth Bhajani,Thalipith Bhajani,Marathi Recipes,Marathi Recipe,Maharashtrian Recipes,Marathi Padarth,Maharashtrian Padarth,भाजणीचे थालीपीठ,थालीपीठ भाजणी सोपी पद्धत,खुशखुशीत थालीपीठ,Healthy Breakfast Recipe,Bhajani Peeth,Dhapate Recipe,multigrain atta ingredients,how to,recipes,thalipeeth recipe Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video.

Comments