У нас вы можете посмотреть бесплатно प्रयत्न | inspirational Story in Marathi | Motivational Stories | Marathi Story | Marathi Goshti или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
स्पर्श तुझा Marathi song Link: • Sparsh Tuza | स्पर्श तुझा | Lyrical S... प्रयत्न | inspirational Story in Marathi | Motivational Stories | Marathi Story | Marathi Goshti एकदा एक माणूस रस्त्याने जात होता, त्याला रस्त्याच्या कडेला हत्ती दिसला. त्या हत्तीला पाहून तो अचानक थांबला. कारण, हत्तीच्या पुढच्या पायात एक साधी दोरी बांधलेली त्याने पाहिली, त्याला खूप आश्चर्य वाटले की, हत्तीसारखा महाकाय प्राणी लोखंडी साखळदंडाऐवजी फक्त एका छोट्या दोरीने बांधलेला आहे? हे तर स्पष्ट होतं की हत्ती त्या दोरीचे बंधन तोडून त्याला पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ शकतो, पण तो हत्ती तसं करत नव्हता. या गोष्टीचं कारण त्याला काही केल्या कळत नव्हतं. त्याने जवळच उभ्या असलेल्या माहुताला विचारलं, “ अहो दादा, हा हत्ती इतक्या साध्या दोरीने बांधलेला आहे आणि तो पळून जाण्याचा प्रयत्नपण करत नाहीये? कसं काय शक्य आहे हे?” तेव्हा माहूत म्हणाला, "हा हत्ती लहानपणापासून या दोरीनेच बांधलेला आहे, तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्यात ह्या दोरीचे बंधन तोडण्याची ताकद नव्हती. सुरूवातीला त्याने बरेच प्रयत्न केले पण ही दोरी त्याच्याने तुटत नव्हती. मग वारंवार येणार्या अपयशामुळे हळूहळू त्याला खात्री झाली, की आपण ही दोरी तोडू शकत नाही. आणि मग मोठा झाल्यावरही त्याचा तो विश्वास अजून तसाच कायम आहे, त्यामुळे तो आता ही दोरी एका झटक्यात तोडू शकत असूनही कधीही ही दोरी तोडण्याचा प्रयत्नच करत नाही. तो माणूस आश्चर्यचकित झाला की हा एवढा बलाढ्य प्राणी त्याचे बंध तोडू शकत नाही; कारण त्याचा तो ‘ते करू शकत नाही’ यावर विश्वास होता!! मित्रांनो, त्या हत्तीप्रमाणेच आपणही पूर्वीच्या अपयशामुळे आता हे काम करू शकत नाहीत, अशी ठाम समजूत करून घेतो आणि आपले संपूर्ण आयुष्य स्वतःच्या मानसिक दोरीत अडकून घालवतो. मित्रांनो, आजपासूनच आपण आपल्याला ज्या कठीण कामांची भीती वाटते ते काम करायचा पुन्हा प्रयत्न करुयात... मलासुद्धा गाण म्हणण्याची भीती वाटायची पण हिम्मत करून मी एक गाण म्हटले आहे. त्याची लिंक description मध्ये दिली आहे. गाण म्हणण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यात चुका असतीलच...पण तुम्ही नक्की ऐका आणि आवडलं तर like आणि comment नक्की करा.