У нас вы можете посмотреть бесплатно तंत्र व ज्ञान यांच्यातील ACTIVE दुवा | Bhau Chaskar Interview | Swayam Talks или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची भावना सर्वत्र तीव्र होत असतानाच, शिक्षणाच्या भविष्याविषयी आश्वस्त वाटावं असं एक नाव म्हणजे भाऊसाहेब चासकर. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बहिरवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून शिकवत असतानाच प्राथमिक शिक्षणात नवनवीन प्रयोग करत राहणारे एक हाडाचे शिक्षक. ग्रामीण-आदिवासी मुलांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनविण्यासाठी निरनिराळे विशेष उपक्रम राबवण्यात नेहमीच पुढाकार. राज्यभरातील हजाराहून अधिक प्रयोगशील शिक्षकांची उर्जा जागृत ठेवून त्यांच्या कृतीशीलतेची मोट बांधणाऱ्या अॅक्टीव टीचर्स फोरमचे संयोजक. वृत्तपत्रीय लिखाण, माहितीपट, व्याख्याने, चर्चासत्रे, छायाचित्रे, सोशल मिडिया अशा विविध माध्यमांतून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण आदी क्षेत्रांत होणारे बदल आणि त्यांचे परिणाम हिरीरीने मांडणारे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. शिक्षण क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्काराचे मानकरी. सह्यगिरीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील रानफुलांचा विशेष अभ्यास. या परिसरातल्या जैवविविधतेचा अभ्यास करण्याच्या हेतूने भाऊंनी निरनिराळ्या प्रकारच्या पाचशेहून जास्त रानफुलांची छायाचित्रे घेतली आहेत. विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत #Marathiinspiration #SwayamTalks