Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आफळे स्मृती महोत्सवात श्रीमती चांदोरकर यांचे व्याख्यान в хорошем качестве

आफळे स्मृती महोत्सवात श्रीमती चांदोरकर यांचे व्याख्यान 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आफळे स्मृती महोत्सवात श्रीमती चांदोरकर यांचे व्याख्यान

ऐहिक व आध्यात्मिक प्रगतीचा सुंदर संगम भारतीय परंपरेत दिसून येतो आणि या कालातीत तत्त्वांबद्दल रंजक प्रकारे जागरूकता निर्माण करण्यासाठी कीर्तन हे एक उत्तम माध्यम आहे. दर वर्षी पुणे-स्थित आफळे अकॅडमीतर्फे राष्ट्रीय कीर्तनसम्राट कै. गोविंदस्वामी आफळे स्मृती महोत्सव आयोजित केला जातो. ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित केलेल्या महोत्सवात श्रीमती अमृता चांदोरकर, संचालक, निरामय वेलनेस सेंटर, यांनी ‘निरामय जीवन’ या विषयावर व्याख्यान दिले. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून समाजाच्या संपूर्ण आरोग्यासाठी निरामय कार्यरत आहे. पंचतत्त्वे, पंचकोश व सप्तचक्रांवर काम करणाऱ्या या उपचार पद्धतीचा असलेला सखोल आध्यात्मिक संबंध त्यांनी समजावून सांगितला. निसर्गचक्रांनुसार जगण्याचे महत्त्व अधोरेखित करताना मानसिक संतुलन व संपूर्ण आरोग्य प्रस्थापित करीत समग्र प्रगती साधण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या ऋतुचर्या व दिनचर्या आणि विविध आश्रमांतील (जीवनाचे टप्पे) लोकांसाठी सांगितलेल्या निरनिराळ्या वैदिक परंपरांचे त्यांनी विश्लेषण केले. यानंतर काही प्रमुख कीर्तनकारांचे कीर्तन झाले व विविध क्षेत्रांत भरघोस योगदान देणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ----- Smt. Chandorkar speaks at Aphale Smruti Mahotsav Indian culture is a wonderful mix of spiritual and material pursuits, and Kirtan (inspiring devotional song) is a great way to spread awareness in an entertaining way about these time-tested principles. Pune-based Aphale Academy organizes the Rashtriya Kirtansamrat Late Govindswami Aphale Smruti Mahotsav every year. Smt. Amruta Chandorkar, Director, Niraamay Wellness Center, conducted a lecture on ‘Niraamay Jeevan’ during the Mahotsav held in October 2022. Niraamay endeavours to promote complete health for the society through the Swayampurna Upchar method. She explained the deep spiritual connection of this healing technique, which works on the Panchtattvas (five basic elements), Panchkoshas (levels of existence) and Saptachakras (seven subtle centers of cosmic energy) in the body. Explaining the importance of living in sync with nature, she highlighted the concepts of Rutucharya (seasonal lifestyle changes) and Dincharya (daily routine) as envisaged in Ayurved, and various Vedic practices recommended for people from different Ashrams (stages of life) so as to achieve sustainable growth through a balanced state of mind and holistic health. This was followed by Kirtans from eminent devotional singers and felicitation of persons making remarkable contribution in different fields. #spiritual #energyhealing #panchkoshisadhna अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   -------- Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments